वयाच्या 17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट ते 3 मुलांची सिंगल मदर, असं आहे कनिका कपूरचं पर्सनल लाइफ

वयाच्या 17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट ते 3 मुलांची सिंगल मदर, असं आहे कनिका कपूरचं पर्सनल लाइफ

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप कनिकावर केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून कनिकाला अटक करावी अशी मागणी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कनिकानं तिला कोरोना झाल्याची माहिती सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर तिनं एक पार्टी सुद्धा अटेंड केली. त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा आरोप कनिकावर केला जात आहे. कनिका लंडनाला तिच्या मुलांना भेटायला गेली होती. कनिका एक सिंगल मदर असून तिनं 2012 मध्ये पतीपासून घटस्फोट घेतला आहे.

सध्या कनिका कपूरवर सर्व स्तरातून टीका होत असली तरीही तिच्या पर्सनल लाइफ बद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. वयाच्या 17 व्या वर्षीच लग्नाच्या बेडीत अडकलेली कनिका कपूर सध्या 3 मुलांची सिंगल मदर आहे. कनिकानं 1997 मध्ये बिझनेसमन राज चंडोकशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 16 वर्षांनंतर या दोघांनी 2012 मध्ये घटस्फोट घेतला. तेव्हापासून कनिका तिच्या मुलांसोबत लंडनला राहते.

अनिल कपूर लवकरच होणार आजोबा? सोनमच्या त्या फोटोंमुळे होत आहे Pregnancy ची चर्चा

View this post on Instagram

Happy diwali #Mine #MissingFew ⚡️

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

कनिका आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहे. मात्र इथंपर्यंत पोहोचणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं कारण तिच्या सिंगिंगच्या प्रोफेशनला तिच्या कुटुंबातूनच विरोध होता. एक मुलाखतीत कनिकानं या गोष्टीचा खुलासा केला. तिचं लग्न झालं त्यावेळी तिच्या सासरच्यांना तिचं कोणत्या इव्हेंटमध्ये गाणं अजिबात आवडलं नव्हचं त्यामुळे त्यांनी तिच्या प्रोफेशनला विरोध केला. फक्त छंद म्हणून गाण्याची कला जोपासण्याची मुभा तिला देण्यात आली.

…म्हणून आमिर खाननं राणी मुखर्जीची फोनवरुन मागितली माफी

लग्नानंतर कनिकाचं गाणं बंद झालं. पण एवढ्यानं खचून जाईल ती कनिका कसली. तिनं घर बसल्या स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत गेले आणि यातूनचं तिला सनी लिओनीचं आयटम साँग ‘बेबी डॉल’ गाण्याची संधी मिळाली. या गाण्यला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि कनिका बॉलिवूडची प्लेबॅक सिंगर झाली. 41 वर्षीय कनिका 3 मुलांची आई असून ती आपल्या मुलांना एकटी सांभाळते. तिची मुलं अनन्या, समारा आणि युवराज सध्या लंडनला शिक्षण घेत आहेत.

Coronavirus Outbreak दरम्यान सोनाक्षी करतेय पार्टी? Video पाहून नेटिझन्स भडकले

First published: March 21, 2020, 1:37 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading