मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिनं नुकतच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. प्रियाने तिचे हो फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियाने फोटो शेअर करत म्हटलं आहे की या स्माईलला किता हार्ट द्याल. मग काय तिच्या या फोटोवर स्माईलचा पाऊसच सुरू झाला. चाहत्यांकडून या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. पिंक आणि रेड कर्लरच्या या वनपिसमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे. प्रिया दुसऱ्या फोटोला देखील कॅप्शन देत म्हटलं आहे की, माझ्या पोझला किती लाईक्स द्याल.तर या फोटोला आतापर्यंत तीस हजारापेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. प्रियाच्या या रेड आणि पिंक गाऊन मधील फोटोशूटने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.