मुंबई, 19 मे : सलमान आणि भाग्यश्रीचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या चित्रपटाने सलमान खान आणि भाग्यश्रीला रातोरात स्टार बनवले. चित्रपटातील प्रत्येक पात्राचे खूप कौतुक झाले. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाली. यामध्ये दूधवाली गुलबिया ही व्यक्तिरेखा होती. जी अभिनेत्री हुमा खानने पडद्यावर साकारली होती. हे पात्र तुम्हाला चांगलेच आठवत असेल. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अगदी हुमा खानला चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देखील स्थान मिळाले होते. पण या अभिनेत्रीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आज आम्ही तुम्हाला हुमा खानबद्दल सांगणार आहोत. हुमा खानच्या फिल्मी करिअरची सुरुवात चांगली झाली आणि तिच्या अभिनयाची लोकांनी चांगलीच प्रशंसा केली. ‘मैंने प्यार किया’ नंतर हुमाने सलमान खानच्या 1999 मध्ये आलेल्या ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातही काम केले. या चित्रपटात तिने आलोक नाथ यांच्या सेक्रेटरीची भूमिका साकारली होती. सलमान खानच्या या दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर लोक हुमाला ओळखू लागले. सलमानच्या चित्रपटांमध्ये काम करून आणि फिल्मी दुनियेत स्वत:चे नाव कमावल्यानंतरही हुमा आज विस्मृतीचे जीवन जगत आहे.
हुमा खानचा जन्म पाकिस्तानात झाला आणि ती तिथेच वाढली. 1970 च्या दशकात ती पाकिस्तानी चित्रपटांमध्ये बाल अभिनेत्री होती. वयाच्या १७ व्या वर्षी ती आपल्या आईसोबत मुंबईत आली. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस, तिने एकाशी लग्न केले जो आधीच दोन मुलांचा बाप होता. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. Rekha Life Story: 6 अफेअर्स, 2 लग्नं आणि ‘त्या’ गर्लफ्रेंडसोबतचं नातं; कायम चर्चेत राहिलं रेखाचं आयुष्य हुमा खानने तिच्या करिअरमध्ये 20 चित्रपटांमध्ये काम केले. सलमान खानशिवाय तिने अनिल कपूर आणि अमृता सिंग यांच्या ‘चमेली की शादी’ या चित्रपटातही काम केले होते. हुमाला साईड रोल्स जास्त मिळायचे. मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये हुमाला विशेष ओळख निर्माण करता आली नाही. यामुळेच तिला सी-ग्रेड आणि हॉरर चित्रपटांमध्ये देखील काम करावं लागलं. हुमा खानने रामसे ब्रदर्ससोबत ‘खूनी रात’, ‘प्यार का देवता’, ‘कफन’, ‘खूनी मुर्डा’ आणि ‘जंवार’ यासह अनेक हॉरर चित्रपटांमध्ये काम केले. 80 आणि 90 च्या दशकात, या प्रकारचे चित्रपट खूप लोकप्रिय होते आणि हॉरर आणि सी-ग्रेड चित्रपटांमध्ये हुमाचं खूपच नाव होतं. जरी हुमा खान साईड रोल करत होती. मात्र चित्रपटसृष्टीत तिचं नाव कायमच चर्चेत असायचं. हुमा खानवर गंभीर आरोप असताना चित्रपट कारकीर्द चांगली चालली होती. हुमा खानवर 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला घरात ओलीस ठेवल्याचा आरोप होता. हुमा खान त्या मुलीला खूप मारहाण करत असे. हुमाने अनेक महिने त्या मुलीला सोबत ठेवले आणि तिला घरातील सर्व कामे करायला लावली. मात्र, या काळात ती मुलीच्या आईला महिन्याला 1500 रुपये पाठवत असे. 2012 मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि ती दोषी आढळली. दोषी ठरल्यानंतर हुमा खानलाही 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणानंतर हुमा खान बॉलीवूडपासून दूर झाली मात्र, ही अभिनेत्री आता कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे हे कोणालाच माहिती नाही.

)







