जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rekha Life Story: 6 अफेअर्स, 2 लग्नं आणि 'त्या' गर्लफ्रेंडसोबतचं नातं; कायम चर्चेत राहिलं रेखाचं आयुष्य

Rekha Life Story: 6 अफेअर्स, 2 लग्नं आणि 'त्या' गर्लफ्रेंडसोबतचं नातं; कायम चर्चेत राहिलं रेखाचं आयुष्य

रेखा

रेखा

बॉलिवूड ते राज्यसभेपर्यंतचा प्रवास केलेल्या अभिनेत्री रेखाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईवडिलांचे लग्न झाले नव्हते. एवढंच काय तर रेखाला तिच्या वडिलांनी कधीच स्वीकारले नाही. 80 च्या दशकातील या नायिकेच्या वैयक्तिक आयुष्याची आजही चर्चा होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 मे :  अभिनेत्री रेखाचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. वडिलांचे अवैध अपत्य असण्यापासून ते 2 लग्न आणि 6 अफेअर्सपर्यंत तिचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं होतं. 80 च्या दशकातील या नायिकेच्या वैयक्तिक आयुष्याची आजही चर्चा होते. रेखाने आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपले स्थान तर मिळवलेच पण आजच्या तरुण पिढीसाठी ती एक अभिनेत्री म्हणून उत्तम उदाहरण मानली जाते. आज आम्ही रेखाला बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री का मानले जाते ते सांगणार आहोत. बॉलिवूड ते राज्यसभेपर्यंतचा प्रवास केलेल्या अभिनेत्री रेखाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईवडिलांचे लग्न झाले नव्हते. एवढंच काय तर रेखाला तिच्या वडिलांनी कधीच स्वीकारले  नाही. रेखाचा रिलीज झालेला पहिला चित्रपट ‘सावन भादो’ होता. या चित्रपटात तिच्या सोबत नवीन निश्चल हे अभिनेते मुख्य भूमिकेत होते. नवीन निश्चल यांचाही हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या, मात्र काही काळानंतर रेखा त्यांच्यापासून विभक्त झाली.

News18लोकमत
News18लोकमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन निश्चलनंतर रेखाच्या आयुष्यात अभिनेता जितेंद्रने प्रवेश केला होता. तेव्हा जितेंद्र आधीच त्याची मैत्रीण शोभा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होते, परंतु शोभा बहुतेक तिच्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात राहत होती आणि याच दरम्यान जितेंद्रचे रेखासोबत अफेअर सुरू झाले.  जितेंद्र रेखाला डेट करत होते पण ते त्याची गर्लफ्रेंड शोभाला सोडायला तयार नव्हते. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.  त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. Shah Rukh Khan: ‘मन्नत’ बंगला बांधताना शाहरुखकडे नव्हते पैसे; पै पै जमवून किंग खानने पत्नीसोबत केली घराची सजावट यानंतर रेखाच्या आयुष्यात किरण कुमारचा प्रवेश झाला, हे नाते काहीच  दिवस टिकले आणि त्यानंतर दोघेही वेगळे झाले. मात्र, रेखा अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात होती. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रेखाच्या आयुष्यात अभिनेते विनोद मेहरा आले.  रेखाने कोलकाता येथे विनोद मेहरासोबत लग्न केले होते, पण जेव्हा विनोद त्यांच्यासोबत त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा विनोदच्या आईने रेखाला घराबाहेर हाकलून दिले आणि विनोदने तिला साथ दिली नाही, मग काय? हे नातेही इथेच संपले. पण रेखाने हे लग्न कधीच उघडपणे मान्य केलं नाही.

News18लोकमत
News18लोकमत

यानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या आयुष्यात प्रवेश केला. रेखाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत जवळपास 10 चित्रपट केले आणि यादरम्यान पडद्यापासून ते ऑफ स्क्रीनपर्यंत त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. मात्र, जेव्हा अमिताभ यांचे रेखासोबत अफेअर सुरू झाले तेव्हा त्यांचे लग्न जया भादुरीशी झाले होते. या दोघांच्या नात्याच्या चर्चांदरम्यान तिने सिंदूर लावायला सुरुवात केली होती. त्यामुळे अमिताभ आणि रेखाचे लग्न झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हे नाते फार काळ टिकले नाही.

News18

अमिताभसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रेखा काही वर्षे पूर्णपणे एकटी राहिली.  रेखा आणि राज बब्बरची भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या जवळ आले. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. दोघांची पडद्यावरही चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. काही काळानंतर रेखाने राज बब्बरशी लग्न करण्याची मागणी केली, मात्र राज बब्बरने रेखाशी लग्न करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. रेखा तिच्या आयुष्यात अजूनही  जोडीदाराच्या शोधात होती. त्यानंतर 80 च्या दशकाच्या शेवटी रेखावर संजय दत्तला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवल्याचा आरोप होऊ लागला. तिने संजय दत्तसोबत लग्न केल्याची बातमी इंडस्ट्रीत वेगाने पसरली. त्यानंतर प्रेमात अनेकदा फसवणूक झालेल्या रेखाची भेट दिल्लीतील एका व्यावसायिकाशी झाली, ज्याचे नाव होते मुकेश अग्रवाल. दोघांचं लग्न झालं, पण कदाचित सेटल होणं रेखाच्या नशिबात नव्हतं. लग्नानंतर काही महिन्यांनीच रेखाला समजले की तिचा पती नैराश्याने त्रस्त होता आणि लग्नाआधीच त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते. हे ऐकून तिला धक्काच बसला. 2 ऑक्टोबर 1990 रोजी रेखाचा पती मुकेश यांनी आत्महत्या केली. मुकेशच्या मृत्यूसाठी सगळेच लोक रेखाला दोष देऊ लागले.

News18

1996 मध्ये रेखाच्या अफेअरची चर्चा पुन्हा एकदा चर्चेत आली.  ‘खिलाडियों के खिलाडी’ या चित्रपटात रेखासोबत अक्षय कुमार आणि रवीना टंडन होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, रेखाने तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमारला डेट करण्यास सुरुवात केल्याची बातमी समोर आली होती. मात्र, रेखा आणि अक्षयने हे नाते कधीच स्वीकारले नाही आणि ते वेगळे झाले. काही वर्षांपूर्वी एक बातमी आली होती की रेखाची एक महिला मैत्रिणही आहे. प्रसिद्ध पत्रकार मोहन दीप यांनी त्यांच्या ‘युरेका’मध्ये हा दावा करून हे रहस्य उलगडले आहे. या पुस्तकात लिहिले आहे की रेखाच्या बंगल्यात तिची पर्सनल सेक्रेटरी फरजाना शिवाय कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. पुस्तकात असा दावाही करण्यात आला आहे की, रेखाच्या बेडरूममध्ये फरजानाशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाही. या दोघींमधील संबंध सामान्य नसल्याचा दावा पत्रकार मोहन यांनी केला आहे. दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहतात. असेही त्यांनी लिहिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात