'तू मला भेटलास ना एकदा की, मग तुझी खैर नाही...' महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी

'तू मला भेटलास ना एकदा की, मग तुझी खैर नाही...' महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांचा एक फॅमिली फोटो शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोवर एका युजरनं त्यांना ट्रोल केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा व्हायरस सध्या भारतात आपले हात-पाय पसरवत आहे. भारतात आतापर्यंत या व्हायरसचे 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात 21 दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे दरवर्षी धडाक्यात साजरा होणारा गुढीपाडव्याचा सण यंदा मात्र शांततेत साजरा झाला. सर्वांनी आपल्या घरीच पाडव्याचं सेलिब्रेशन केलं. दरम्यान दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांचा एक फॅमिली फोटो शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या फोटोवरून ट्रोल करणाऱ्याला आता महेश मांजरेकर यांनी धमकीच देऊन टाकली आहे.

महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर गुढीपाडव्याला संपूर्ण फॅमिलीचा फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘आम्ही एकत्र आहोत. आज गुढीपाडवा, पण करोनावर विजय मिळवल्यावर आपण सर्वसण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करुया. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवा’ असा मेसेज दिला होता. त्यांच्या या फोटोवर त्यांच्या सर्वच चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या मात्र एक युजरनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ करत ट्रोल केलं.

रामायणातील सीता वयाच्या 64 व्या वर्षींही दिसते ग्लॅमरस, सध्या या कामात असते बीझी

फोटोवरील ट्रोलरची कमेंट पाहून महेश मांजरेकर यांचा पारा चढला आणि त्यांनी त्याला सरळ धमकीच देऊन टाकली. या युजरच्या कमेंटवर रिप्लाय करताना महेश मांजरेकर यांनी लिहिलं, 'तू मला भेटलास ना एकदा की, मग तुझी खैर नाही. मी तुला लवकरात लवकर शोधून काढेन. करोनामुळे जे सुरु आहे ते सर्व शांत होऊ दे. मी तुला शब्द देतो तुला शोधण्यासाठी मला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावं लागलं तरी चालेल पण मी तुला शोधून काढेन’

धक्कादायक! Coronavirus दरम्यान 36 वर्षीय अभिनेत्याचं निधन

दरम्यान सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या सर्वच सिनेमा आणि मालिकांचे शूटिंग बंद पडल्यानं टीव्हीवरही रिपीट टेलिकास्ट करण्याची वेळ आली आहे.

खूशखबर! 'या' वेळेत पुन्हा प्रसारित होणार 'रामायण', प्रकाश जावडेकर यांची माहिती

First published: March 27, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या