मुंबई, 26 जून : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 10 वा दिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं लोकसभा आणि राज्यसभेच्या चर्चेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (25 जून) लोकसभेत तर आज (26 जून) ला राज्यसभेत भाषण केलं. दरम्यान भाषणात मोदींनी काँग्रेस सरकारवर कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले, ‘काँग्रेस सरकारमध्ये काही ना काही दोष आहेच ते ना हार पचवू शकत आणि नाही विजय पचवू शकत.’ तसेच त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेता गुलाम नबी आझाद यांना म्हटलं, ‘गुलाम नबी जी, काही दिवस घालवा गुजरातमध्ये…’ VIDEO: रितेश देशमुखने सांगितलं त्याच्या सुखी संसाराचं रहस्य पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात, गालिब यांची एक शेर ऐकवला ‘ताउम्र ग़ालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और मैं आईना साफ़ करता रहा.’ मोदींनी हा शेर संसदेत ऐकवल्यानंतर लेखक आणि शायर जावेद अख्तर यांनी या त्याला चुकीचा शेर म्हणत एक ट्वीट केलं. अख्तर यांनी लिहिलं, ‘पीएम मिनिस्टर साहेब जो शेर तुम्ही राज्यसभेच्या भाषणात ऐकवला त्यामुळे गलिब यांचा चुकीचा शेर सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.’ #Metoo: नाना पाटेकरांना दबावाखाली क्लीन चिट? पण नंतर तनुश्री फिरकलीच नाही!
The sher that the prime minister saheb has quoted in his Rajya Sabha speech is wrongly attributed to Ghalib in the Social media . Actually both the lines are not even in the proper meter .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) June 26, 2019
जावेद यांच्या मते, मोदींनी ऐकवलेला या शेरच्या दोन्ही ओळी शायरीच्या मीटरमध्ये बसत नाहीत. मात्र जावेद यांचा मोदींना ट्रोल करायचा प्रयत्न तिथेच फसला आणि युजर्सनी जावेद यांनाच ट्रोल करायला सुरुवात केली. टायटॅनिकचा अभिनेता चेन्नईच्या मदतीला आला धावून, केली ‘ही’ कमेंट
एका युजरनं लिहिलं,जावेदजी आम्ही तुमचा खूप सन्मान करतो. पण हे सर्व तुम्हाला शोभा देत नाही. तर दुसऱ्या एका युजरनं ‘तुम्ही ग्रामर पाहा लोकांना जे समजायचं ते त्यांनी समजून घेतलं आहे.’ असं लिहिलं. एवढंच नाही तर काहींनी जावेद इख्तर यांना अक्षरशः सीरिया आणि इराक जाण्याचाही सल्ला दिला. =========================================================== अक्षयचा ‘सूर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी