मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तेलुगू सुपरस्टारच्या मुलीने अशी म्हटली मराठी आरती, VIDEO व्हायरल

तेलुगू सुपरस्टारच्या मुलीने अशी म्हटली मराठी आरती, VIDEO व्हायरल

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांची मुलगी सितारा हिचा एक खूपच क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 08 सप्टेंबर : तेलुगू सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) हे सिनेसृष्टीतील अनेकांचं फेव्हरिट कपल आहे. चाहते त्यांच्या कुटुंबाकडे एक परफेक्ट फॅमिली म्हणून पाहतात. नम्रता देखील त्यांच्या मुलांचे व्हिडीओ, फोटो वेळोवेळी शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नम्रताने तिची 3 वर्षाची मुलगी सितारा (Sitara) हिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चक्क ती मराठी आरती म्हणत आहे. आपल्या गोड आवाजात दुर्गेची आरती म्हणणाऱ्या सिताराचे तिच्या आईला देखील खूप कौतुक वाटत आहे.

नम्रताने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, 'ज्यांना गणपतीच्या आरत्या ठावुक आहेत आणि जे गातात त्यांच्यासाठी, हा सिताराचा प्रामाणिक प्रयत्न! केवळ 3 वर्षाची आहे. तिला याचा अर्थ किंवा उच्चार माहित नाही. मात्र केवळ ऐकून ऐकून तिने म्हटले आहे. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे. You are the best', अशा शब्दात तिने सिताराचे कौतुक केले आहे.

(हे वाचा-अनन्याचा 'Khaali Peeli' पाहण्यासाठी प्रत्येक वेळी द्यावे लागणार पैसे, वाचा कारण)

(हे वाचा-Drug Case : रागिणी द्विवेदीपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीला अटक, CCB ची मोठी कारवाई)

हा व्हिडीओ देखील खूप Cute आहे. नम्रताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून, सर्वांच्या पसंतीस सिताराचा हा व्हिडीओ आला आहे. अनेकांनी ती खूपच क्यूट असल्याचे म्हटले आहे. दरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. सिताराच्या या व्हिडीओवर देखील काही युजर्सनी अशी कमेंट केली आहे की, त्यांचे कुटुंब अनेकांचे फेव्हरिट आहे.

First published: