मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Drug Case : रागिणी द्विवेदीपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीला अटक, CCB ची मोठी कारवाई

Drug Case : रागिणी द्विवेदीपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीला अटक, CCB ची मोठी कारवाई

कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील अंमली पदार्थ वापराबाबत सेंट्रल क्राईम ब्रँच (Central Crime Branch) कडून तपास सुरू आहे. याप्रकरणी एक महत्त्वाची घडामोड समोर येते आहे. अभिनेत्री संजना गलरानी (Sanjjana Galrani) हिला अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

बेंगळुरू, 08 सप्टेंबर : कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील अंमली पदार्थ वापराबाबत सेंट्रल क्राईम ब्रँच (Central Crime Branch) कडून तपास सुरू आहे. याप्रकरणी एक महत्त्वाची घडामोड समोर येते आहे. अभिनेत्री संजना गलरानी (Sanjjana Galrani) हिला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या अटकेनंतर करण्यात आलेली ही महत्त्वाची अटक आहे. बड्या पार्ट्यांमध्ये अंंमली पदार्थ पुरवण्याचा आरोप रागिणीवर करण्यात आला आहे. त्यानंतर आज सकाळी संजनाला तिच्या इंदिरा नगर याठिकाणी असणाऱ्या घरातून अटक  करण्यात आली. तिला सीसीबी कार्यलयामध्ये चौकशीसाठी नेण्यात आले आहे. सीसीबीनुसार संजना त्यांच्या रडारवर होती, जेव्हापासून तिचा मित्र राहुलला ताब्यात घेण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी विरेन खन्ना याच्या घरावर देखील छापे टाकले आहेत. खन्नाला याअगोदरच ड्रग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

(हे वाचा-अवैध बांधकामाचा आरोप करत BMCची कंगनाला नोटीस, तरीही मानले चाहत्यांचे आभार)

न्यायालयाकडून वॉरंट प्राप्त झाल्यानंतर, अभिनेत्री संजना गलरानीच्या बेंगळुरूमधील घरात सेंट्रल क्राइम ब्रँच ड्रग्ज प्रकरणात झाडाझडती घेण्यात आली. मंगळवारी याबाबत संयुक्त सीपी गुन्हे, संदीप पाटील यांनी माहिती दिली होती.

सोमवारी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, ज्यानुसार तिला 5 दिवसांच्या कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे.  बेंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी अशी माहिती दिली होती की, ड्रग प्रकरणातील सहभागामुळे कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान 'रागिणी द्विवेदीला अटक करून तिला ताब्यात घेण्यात आले आहे', अशी माहिती पाटील यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिली आहे.

(हे वाचा-जंगलाच्या विकासासाठी प्रभासची 2 कोटींची मदत,दत्तक घेतलं 1650 एकर राखीव वनक्षेत्र)

रागिणीव्यतिरिक्त अटक करण्यात आलेल्यांची नावे राहुल आणि विरेन खन्ना अशी आहेत. त्याआधी गुरुवारी रविशंकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. रागिणीच्या घरावर सीसीबीने शुक्रवारी छापा टाकला होता.

रागिणीच्या अटकेनंतर संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकरणात खन्ना मुख्य आहे जो मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करत असे आणि त्यामध्ये ड्रग्ज उपलब्ध करून देत असे. तो दिल्लीमध्ये होता आणि सीसीबीचे दोन पोलीस निरिक्षक त्याला अटक करण्यासाठी गेले होते आणि त्यांनी त्याला अटक केली आहे.'

First published: