मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) स्टारर 'खाली पीली' (Khaali Peeli) 2 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा झी प्लेक्स (Zee Plex) वर प्रदर्शित होणार असून या सिनेमापासून 'पे पर व्यू' (Pay per View) ही नवीन परंपरा सुरू केली जाणार आहे. यानुसार कोणताही सिनेमा प्रत्येकवेळी पाहताना पैसे द्यावे लागणार आहेत. सिनेमागृहात चित्रपट पाहण्याच्या संकल्पनेवर ही नवीन संकल्पना आधारित आहे. ज्याप्रमाणे सिनेमागृहात एखादा सिनेमा वारंवार पाहताना तुम्हाला पैसे द्यावे लागतात, तसेच इथे द्यावे लागतील. झी 5वर देखील हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान असे समोर येत आहे की, ओटीटीवर सिनेमा प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कारण या प्लॅटफॉर्मवर सब्सक्रायबर्स वन टाइम सब्सक्रिप्शन घेऊन कितीही वेळा सिनेमा पाहतात. म्हणजेच त्यांना एकदाच पैसे भरावे लागतात.
(हे वाचा-Drug Case : रागिणी द्विवेदीपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीला अटक, CCB ची मोठी कारवाई)
पे पर व्यू मध्ये जेवढ्या वेळा सिनेमा पाहाल तेवढ्या वेळा पैसे द्यावे लागतील. याबाबतीत झी स्टुडिओजचे सीईओ शारिक पटेल यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना अशी माहिती दिली की, याबाबत अद्याप किंती शुल्क आकारायचे हे निश्चित नाही, लवकरच किंमत ठरवली जाईल.
दरम्यान खाली पिली या सिनेमाचे 'Beyonce Sharma Jayegi' हे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आलिया भट्टच्या 'सडक-2' च्या गाण्याप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांच्या डिसलाइक्सचा सामना करावा लागत आहे.