जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन /  सेटवरील सर्व क्रू मेंबर्सची जबाबदारी पूर्णपणे निर्मात्यांवर, राज्यातल्या प्रोड्यूसर्संना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विशेष सूचना

 सेटवरील सर्व क्रू मेंबर्सची जबाबदारी पूर्णपणे निर्मात्यांवर, राज्यातल्या प्रोड्यूसर्संना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विशेष सूचना

 वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

मीडिया रिपोर्टनुसार कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र सरकारने सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत शुटींगला परवानगी दिलेली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी चित्रपट आणि टीव्ही निर्मात्यांना (Producers) शुटींग स्थळ तसेच शुटींगच्या वेळेसंदर्भात पोलिसांसोबत समन्वय साधण्याचा आदेश दिला आहे. यादरम्यान निर्मात्यांनी शुटींगची ठराविक वेळ वाढवण्यासंबंधी मागणी केली होती. फिल्म प्रोड्यूसर्स गिल्डच्या सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांनी म्हटलं आहे, नियमित कोरोना चाचणी करण्यात यावी, कोरोना महामारी संबंधित नियमांचं पालन करण्यात यावं, तसेच चित्रपट आणि सेटवरील इतर श्रमिक व्यक्तींचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं.  तसेच मुख्यमंत्र्यांनी असंदेखील सांगितलं आहे, की सेटवर उपस्थित सर्व क्रू मेंबर्सची जबाबदारी पूर्णपणे निर्मात्यांवर असेल. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुसार, या बैठकीमध्ये नागराज मंजुळे, राकेश ओमप्रकाश मेहरा, रितेश सिधवानी, सुबोध भावे आणि रवी जाधवसोबत इतर लोकही उपस्थित होते. (हे वाचा:  HBD: वडील मंत्री तर आई समाजसेविका, तरीही संघर्षात गेलं भूमी पेडणेकरचं बालपण ) सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत शुटींगला परवानगी- मीडिया रिपोर्टनुसार कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र सरकारने सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत शुटींगला परवानगी दिलेली आहे. तसेच प्रत्येक शुटींगसाठी पोलिसांची आधीपासून परवानगी घेणं बंधनकारक आहे. तसेच सेटवर कोरोना संबंधी प्रत्येक प्रोटोकॉल व्यवस्थितरित्या सांभाळणंदेखील बंधनकारक आहे. (हे वाचा: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत विनोदाचा बादशाह घेणार एन्ट्री; जॉनी लिव्हर विशेष भाग ) निवेदनानुसार, फिल्म प्रोड्यूसर्स गिल्डच्या सदस्यांनी शुटींगची वेळ ठराविक वेळ 4 ही वाढवण्यात यावी, तसेच त्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करण्याचं आश्वासनदेखील मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात