मुंबई 17 जुलै : सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) मध्ये कॉमेडी किंग जॉनी लिव्हर (Johny Lever) यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची ही उत्कंठा वाढली आहे. गेली अनेक दशके विनोदावर ज्याने राज्य केलं असे विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर सध्या चित्रपटांत जास्त दिसत नसले तरीही त्यांचे विनोद आजही प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडतात. जॉनी आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात येणार आहेत. त्यांचा विशेष भाग रंगणार आहे. नुकताच सोनी मराठी वाहिनीने याचा प्रोमो प्रदर्शित केलं असून प्रेक्षकही उत्सुक आहेत. (Johny Lever in Maharashtrachi Hasyajatra)
‘पाहिले नं मी तुला’ मालिकेत येणार आनंदी क्षण; मनू-अनिला मिळणार बाबांचा आशीर्वादमहाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात अनेक मातब्बर कलाकार काम करताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री आणि विनोदवीर विशाखा सुभेदार, समीर चौगुले, भूषण कडू, रसिका वेंगुर्लेकर असे कलाकार आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) या शोच सूत्रसंचालन करते तर अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या शोचे परीक्षक आहेत. येत्या 18 जुलैला रविवारी 2 तासांचा विशेष भाग रंगणार आहे.
20 दिवसांत आलियाने केली कमाल! फिटनेस चॅलेंज पाहून कतरिनाही झाली अवाकअभिनेते जॉनी लिव्हर यांचे लाखो चाहते आहेत. तर त्यांच्या विनोदाचे भारतासह विदेशातही फॅन्स आहेत. अनेक चित्रपटांत आणि कार्यक्रमांत ते दिसले होते. त्यांच्या विनोदी शैलीने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाला ते खळखळून हसवतात. सध्या ते चित्रपटांत जास्त दिसत नाहीत. तर काही मालिकांमध्ये ते दिसले होते. लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर (Jamie Lever) देखील विनोदी अभिनेत्री आहे.