कमी काळातच बॉलिवूडमध्ये आपली मोठी ओळख निर्माण करणारी आभिनेत्री भूमी पेडणेकर संघर्ष करून बॉलिवूडमध्ये आली होती. श्रीमंत घरात जन्म होऊनही तिला संघर्ष करावा लागला होता. पाहा तिच्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी.
भूमीचा जन्म मराठी आणि हरियानवी अशा पार्श्वभूमीत झाला होता. वडिल मराठी तर आई हरियानवी होते. १८ जुलै १९८९ ला मुंबईत झाला होता.
भूमीच्या वडिलांचं तोंडाच्या कॅन्सरने निधन झालं होतं. ते कामगार मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर भूमीच्या आईने टोबॅकोविरोधात जनजागृती करत समाजसेवा सुरू केली होती.
भूमी १५ वर्षांची असताना तिच्या आईने तिच्या अभिनय करिअरसाठी कर्ज घेतलं होतं. विस्लिंग वूड या इन्स्टीट्युमध्ये तिने अॅडमिशन घेतलं होतं.
पण वर्षभरातच तिने ते सोडून दिलं व यशराज स्टुडीओजमध्ये कास्टींग डिरेक्टर म्हणून नोकरी सुरू केली. त्यातून तिने सगळं कर्ज फेडलं होतं.
जवळपास ६ वर्षे भूमीने यशराज स्टुडीओजमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिने अभिनयासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती.