मुंबई 17 एप्रिल : ऍपल या जगप्रसिद्ध ब्रँडचे सीईओ टिम कुक सध्या भारतात आले आहेत. भारतात येताच त्यांनी मुंबईला भेट दिली. मुंबईत त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली. 18 एप्रिलला मुंबईच्या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये देशातील पहिलं ऍपल स्टोर लाँच होणार आहे. त्याचसाठी ऍपलचे सीईओ टिम कुक भारतात आले आहेत. दरम्यान मुंबईत येताच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिनं टिम कुक यांचं स्वागत केलं. माधुरीनं टिम कुकचं स्वागतही मुंबई स्टाइलनं केलं. त्यांना थेट मुंबईचा जगप्रसिद्ध वडापाव खाऊ घातला. गुगलच्या सीईओंबरोबरचा वडापाव खाताना फोटो माधुरीनं शेअर केला आहे.
माधुरी दीक्षितनं टिम कुक यांच्याबरोबर वडापाव खातानाचा शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वत्र या फोटोची चर्चा आहे. यावरून हे कळतंय की माधुरी दीक्षित पक्की मुंबईकर आहे. माधुरीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती आणि टिम कुक एका हॉटेलमध्ये बसले आहेत. दोघांच्या हातात वडापाव आहे आणि दोघेही गप्पा मारत असतानाचा कॅन्डिड फोटो माधुरीनं शेअर केला आहे. मुंबईत वडापेक्षा चांगलं स्वागत असूच शकत नाही, असं भन्नाट कॅप्शन माधुरीनं फोटोला दिलं आहे. टिम कुकनं देखील माधुरीचे आभार मानलेत. “मला मुंबईच्या वडापावची ओळख करून दिली”, असं त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा - ‘या’ खेळात पारंगत आहे आर माधवनचा मुलगा; 1-2 नाही भारतासाठी पटकावली 5 गोल्ड मेडल्स
Can’t think of a better welcome to Mumbai than Vada Pav! pic.twitter.com/ZA7TuDfUrv
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) April 17, 2023
माधुरीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स करत चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरनं लिहिलंय, “वडापाव फक्त स्वागतासाठी नाही तो तर सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे”. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, “कितीही वडापाव खाऊ घातला तरीही आयफोन काही स्वस्त मिळणार नाही”. तर आणखी एका युझरनं लिहिलंय, “टिम कुकला मुंबई लोकलनं फिरवा आणि त्यांना धारावी देखील दाखवा”. ऍपलचे सीईओ जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलच्या लाँचसाठी मुंबईत आले असले तरी माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने 2016साली टिम कुकला भेटले होते. तेव्हाही टिक कुक भारत दौऱ्यासाठी आले होते. टिक कुक 18 एप्रिलला मुंबई पहिलं ऍपलचं स्टोर लाँच करणार आहेत. मग 20 एप्रिलनंतर दिल्ली आणि त्यानंतर भारतातील इतर वेगवेगळ्या ठिकाणी लाँच करणार आहेत. बुधवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील टिम कुक भेट घेणार आहेत.