अभिनेता आर माधवनसाठी आजचा दिवस खरोखर अभिमानास्पद असणार आहे. त्याच्या लेकानं म्हणजेच वेदांतने देशसाठी एक दोन नाही तर तब्बल 5 गोल्ड मेडल्स पटकावली आहेत.
वेदांत आर माधवन हा स्विमिंगमध्ये चॅम्पियन आहे. त्यानं स्विमिंग चॅम्पियनमध्ये भारताला पाच गोल्डन मेडल्स मिळवून दिली आहे.
वेदांत माधवनने 58व्या MILO/MAS मलेशिया इनव्हिटेशन एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला हता.
या स्पर्धेत वेदांतनं 50, 100, 200, 400 आणि 1200 मीटर पर्यंत पोहोचण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता आणि ही स्पर्धा तो जिंकून आला आहे.
गळ्यात पाच गोल्ड मेडल असलेला वेदांत माधवनचा फोटो सध्या सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
आर माधवनच्या मुलाचं सगळ्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे. इतर स्टार किड्सपेक्षा तो नेहमीच वेगळा ठरला आहे.