Home /News /entertainment /

सिनेमात काम करण्यासाठी निर्मात्यांनी ठेवली होती ही अट, 'रामायण'च्या सीतेनं दिला नकार

सिनेमात काम करण्यासाठी निर्मात्यांनी ठेवली होती ही अट, 'रामायण'च्या सीतेनं दिला नकार

दीपिका यांना सिनेमांसाठी बऱ्याच ऑफर आल्या मात्र निर्मात्यांच्या एका अटीसाठी त्यांनी सिनेमात काम करण्यास नकार दिला.

    मुंबई, 18 मार्च : रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. दूरदर्शनवर या शोचं रि-टेलिकास्टिंग सुरू केलं गेलं आणि या शोच्या जुन्या आठवणींना अचानक उजाळा मिळाला. रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. ज्यावेळी रामायण टीव्हीवर सुरू झालं होतं त्यावेळी त्यातील कलाकारांची लोकप्रियता एवढी वाढली होती की, लोक त्यांनाच देव समजून त्यांची पूजा करू लागले होते. हा शो संपल्यानंतर दीपिका यांना सिनेमांसाठी बऱ्याच ऑफर आल्या मात्र निर्मात्यांच्या एका अटीसाठी त्यांनी सिनेमात काम करण्यास नकार दिला. दीपिका चिखलिया यांनी अनेक सिनेमात काम केलं मात्र त्यांनी कोणत्याही सिनेमात शॉर्ट ड्रेस घातले नाहीत. त्या नेहमीच अंगभर कपड्यात दिसल्या आणि याबाबत त्यांनी आता सर्वात मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत दीपिका यांनी सांगितलं की, रामायणनंतर मला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. पण या ऑफर अशा होत्या की, तुम्ही स्विमिंग कॉस्ट्यूम घाला, बॉडी रिव्हिलिंग कपडे घाला. किंवा मग दमयंती, पार्वती सारख्या भूमिका. त्यांवेळी त्यांच्या मनात एवढंच होतं की मी माझी जुनी इमेज सोडून मॉडर्न इमेजमध्ये लोकांसमोर यावं. स्वप्नील जोशी 19 एप्रिलची आतुरतेनं पाहतोय वाट, हे आहे कारण दीपिका म्हणाल्या, मला माहित होतं की, सीतेची भूमिका साकारल्यानंतर माझी एक वेगळी प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली होती. लोक मला देवीचा अवतार मानत होते. त्यामुळे मी त्यांच्या मनातली ती प्रतिमा तोडून त्यांना निराश करु शकत नव्हते. दीपिका पुढे सांगतात, काही वेळा लोक मला जास्त पैसे सुद्धा ऑफर करत. तर कधी सांगत की पुढचे तीन सिनेमा आम्ही तुमच्यासोबत साइन करू पण तुम्हाला सीतेची इमेज ब्रेक करावी लागेल. अशावेळी तुम्ही तुमची इमेज ब्रेक करता किंवा ती घेऊनच पुढे जाता. माझ्याबाबतीत असं होतं की, मला ही इमेज तोडायची नव्हती. कारण ती खूप स्ट्रॉन्ग होती. मलायकाशी लग्नाचा काय प्लान आहे? चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुनचं धम्माल उत्तर बॉयफ्रेंड असावा तर असा! पत्रलेखासाठी राजकुमार झाला हेअर स्टायलिस्ट, पाहा VIDEO
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Ramayana

    पुढील बातम्या