मुंबई, 20 मे: सध्या मराठी सिनेसृष्टीत एकामागून एक भन्नाट सिनेमा (Cinema ) आणि वेब सिरीज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजच रानबाजार (Ranbaazaar Marathi Web Series)) ही बहुचर्चित मराठी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) यात मुख्य भूमिकेत आहेत. एकीकडे रानबाजार तर दुसरीकडे प्राजक्ताच्या Respect या वेब सिरीजची चर्चा आहे कारण त्यात प्राजक्ता समलैंगिक व्यक्तीची (lesbian) भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यात मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीजमधून पहिल्यांदा मराठी अभिनेत्री समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठीत हा पहिलाच प्रयोग असला तरी बॉलिवूडमध्ये अशा आशयाचे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. अनेक अभिनेत्रींनी लेस्बियनची भूमिका साकारली आहे. आता प्रिया आणि प्राजक्ताच नाही तर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. माधुरीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फेम गेम (The Fame Game) या पहिल्या ओटीटी कलाकृतीनंतर माधुरी दीक्षित आपल्याला ‘मजा मा’ (Maja Maa) या सिनेमात दिसणार आहे. माधुरीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील तिचा हा सिनेमा सर्वात वेगळा ठरणार आहे. चौकटीच्या पलिकडे जाऊन माधुरी यात समलैंगिक भूमिका साकारणार आहे. फेम गेम ही सिरीज सस्पेंस थ्रिलर होती तर मजा मा हा सिनेमा एका गोंधळलेल्या कुटुंबावर आधारीत असणार आहे. विषय थोडा हलका फुलका असला तरी महत्त्वाचा सामाजिक संदेश देणार आहे. माधुरी यात एका प्रेमळ आईची भूमिका निभावणार आहे. परंतु हीच प्रेमळ आई तिच्या मुलाच्या लग्नात अडथळा बनते आणि तिच्या समलैंगिक असल्याचा सर्वासमोर खुलासा होतो. हेही वाचा - प्राजक्ता माळीचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ’ आता हे काय…?’ आनंद तिवारी दिग्दर्शित ‘मजा मा’ हा सिनेमा 28 डिसेंबर 2022 रोजी अमॅझोन प्राइमवर रिलीज होणार असून सिनेमात अभिनेते गजराज राव माधुरीच्या पतीची भूमिका निभावणार आहे. गजराज हे ‘बधाई दो’ सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसले होते. यासह सिनेमात अभिनेता ऋत्विक भौमिक, रजित कपूर, सिमोन सिंह, बरखा सिंह आदी कलाकार दिसणार आहेत. मजा मा या सिनेमाविषयी बोलताना माधुरी म्हणाली होती, माझा अभिनय, नृत्याचा वापर ‘मजा मा’साठी करणं हा माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा अनुभव आहे. संपूर्ण टीम सोबत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी फार सुंदर अनुभव होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.