Home /News /entertainment /

प्राजक्ता माळीचा रानबाजार नंतरचा 'तो' फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ' आता हे काय...?'

प्राजक्ता माळीचा रानबाजार नंतरचा 'तो' फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ' आता हे काय...?'

प्राजक्ता माळीचा एक नवीन फोटो समोर आला आहे. नेटकऱ्यांनी देखील 'हे काय...?' असा प्रश्न हा फोटो पाहून उपस्थित केला आहे.

  मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरमध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांनी मात्र तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. काहींनी प्राजक्ताचं वेगळी भूमिका निवडल्याने तिचं कौतुक देखील केलं. आता या सगळ्यात प्राजक्ता माळीचा एक नवीन फोटो समोर आला आहे. नेटकऱ्यांनी देखील 'हे काय...?' असा प्रश्न हा फोटो पाहून उपस्थित केला आहे. प्राजक्ता माळीचा चर्चेत आलेला हा फोटो दुसऱ्या कोणासोबत नाही तर अभिनेत्री ऋतुजा बागवे(Rutuja Bagwe) हिच्यासोबत आहे. सध्या प्राजक्ता आणि ऋतुजाचा हा फोटो पाहून एका बोल्ड कथानकाची चर्चा रंगली आहे. हा फोटो ऋतुजा बागवे(Rutuja Bagwe) आणि प्राजक्ता माळीच्या Respect नावाच्या सिनेमातील आहे. वाचा-सुयश-आयुषीपासून ते आदिश-रेवतीपर्यंत 'या' कलाकारांनी लावली होती लग्नाला हजेरी Respect हा सिनेमा येत्या 22 मे रोजी Zee5 आणि झी टॉकीजवर आपल्या भेटीस येत आहे. Respect मध्ये सहा स्त्रीयांची गोष्ट वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून मांडली आहे. याच सिनेमासाठी हे फोटोशूट करण्यात आलं आहे. या सिनेमातील काही भाग मेघालयमध्ये शूट केला आहे. त्यावेळचा हा फोटो आहे. ऋतुजा बागवेने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
  मात्र तिच्या या फोटोवर कमेंट करत म्हटलं आहे की, हे काय....? तर आणखी एकानं म्हटलं आहे की, हे चालय तरी काय?..अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. याशिवाय काहींनी हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील म्हटलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या