मुंबई, 7 ऑक्टोबर- बॉलिवूडमधील सर्वात गोड जोडपं म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरकडे पाहिलं जातंय. हे दोघेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी व्यावसायिक तरी कधी खाजगी गोष्टींमुळे हे दोघे लक्ष वेधून घेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीर आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर प्रचंड आनंदी आहेत. दरम्यान आता हे दोघे आपल्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच आलिया भट्टचं डोहाळजेवण पार पडलं. दरम्यान आता अभिनेत्रीला धक धक गर्ल माधुरी दीक्षितने एक खास भेटवस्तू पाठवली आहे. बिपाशा बसूनंतर नुकतंच आलिया भट्टचंदेखील डोहाळजेवण पार पडलं. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये भट्ट आणि कपूर फॅमिलीसोबत आलियाच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. दरम्यान आलियाला अनेक भेटवस्तूही मिळाल्या आहेत. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितनेसुद्धा भेटवस्तू पाठवत या जोडप्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. नुकतंच ‘झलक दिखला जा’ प्रसिद्ध या टीव्ही शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये रणबीर कपूरची आई आणि आलियाची सासू नीतू कपूर यांनी पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये स्पर्धक असणाऱ्या अभिनेत्री नीती टेलरने आपल्या डान्सच्या माध्यमातून आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासोबतच परीक्षक माधुरी दीक्षितनेही रणबीर आणि आलियावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. माधुरी दीक्षितने नीतू कपूर यांच्याजवळ आईबाबा बनणाऱ्या आलिया आणि रणबीरला श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली आहे.सध्या हा एपिसोड चांगलाच चर्चेत आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यातचआलियाने आपल्या प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली होती. आता हे गोड जोडपं आईबाबा बनणार आहे. रणबीर आणि आलिया आई-बाबा होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. नुकतंच आलियासाठी डोहाळजेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. आलिया भट्टनेही काही तासांपूर्वी आपल्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
**(हे वाचा:** Alia Bhatt Baby Shower : बिपाशानंतर आलियाचं ‘बेबी शॉवर’; कपूर, भट्ट फॅमिलीसह शाळेच्या मैत्रिणींची हजेरी ) यंदाचं वर्ष आलिया आणि रणबीर ठरलं आहे. या दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटाच्या सेटवरच आलिया आणि रणबीरमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी तब्बल 7…8 वर्षे एकेमकांना डेट केलं आहे. आणि चित्रपट रिलीजपूर्वीच या दोघांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. लवकरच हे दोघे आईबाबा बनण्णर आहेत. त्यामुळे हे वर्ष दोघांसाठी फारच धमाकेदार होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.