बॉलिवूडची प्रेग्नंट अभिनेत्री आलिया भट्टचं बेबी शॉवर कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं अखेर दसऱ्याच्या दिवशी आलियाचं बेबी शॉवर पार पडलंय.
आजी नीतू कपूर, रिद्दीमा कपूर ते करिश्मा कपूरही लाडक्या आलियाच्या बेबी शॉवरला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
कपूर , भट्ट फॅमिली तर होतीच मात्र आलियाच्या शाळेतल्या मैत्रिणींनी देखील बेबी शॉवरला हजेरी लावली होती.
पिवळ्या ड्रेसमध्ये संपूर्ण फॅमिलीबरोबर वेळ घालवत असताना आलियाचा प्रेग्नंसी ग्लो दिसून आला. बेबी शॉवरचा कार्यक्रम सगळ्यांनी धुम धडाक्यात साजरा केला.
नीतू कपूर, रिध्दीमा कपूर, आजी नीला देवी, आलियाची बहिण शाहीन भट्ट देखील ट्रेडिशन आऊटफिटमध्ये बेबी शॉवरमध्ये दिसली.
त्याचप्रमाणे रणबीरच्या सगळ्या बहिणी देखील बेबी शॉवरला आल्या होत्या. करिश्मा कपूर, आकांक्षा रंजन सिंह, नव्या नंद, श्वेता बच्चन, आरती शेट्टी बरोबर रणबीर दिसली.
आलियाच्या बेबी शॉवरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.