मुंबई, 5 ऑक्टोबर- ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या पन्नाशीतही अभिनेत्रीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाहीय. आजही माधुरी दीक्षित तितकीच ऍक्टिव्ह, फिट आणि ग्लॅमरस आहे. माधुरी दीक्षित आपल्या अभिनयासोबतच आपल्या लग्जरी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. डॉक्टर श्रीराम नेनेंशी लग्नगाठ बांधलेल्या माधुरीकडे अफाट संपत्ती आहे. यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. नुकतंच माधुरीने नवं घर खरेदी केलं असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती सध्या छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्या लुक्स आणि डान्समुळे सतत चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षितने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराचे जबरदस्त फोटो समोर आले आहेत. सध्या अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आहे. माधुरी दीक्षितने नुकतंच मुंबईत एक आलिशान सी फेसिंग घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत तब्बल 48 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईच्या लोअर परळ भागात एका अपार्टमेंटच्या 53 व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितच्या या घराची नोंदणी प्रक्रिया 28 सप्टेंबर 2022 रोजी पार पडली होती.
या रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितने हे घर इंडियाबुल्स ब्ल्यूच्या लोअर परळ भागात खरेदी केलं आहे. तसेच अभिनेत्रीची ही प्रॉपर्टी दक्षिण मुंबईच्या वरळी भागात आहे. हे घर 10 एकर जागेत बनलं आहे. अभिनेत्रीने खरेदी केलेल्या या प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल, फुटबॉल पीच, जिम, स्पा, क्लब आणि अनेक आलिशान सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.
**(हे वाचा:** Sridevi: श्रीदेवींनी ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये परिधान केलेल्या साड्यांचा होणार लिलाव; मिळालेल्या रक्कमेचं नेमकं काय होणार? ) तसेच मीडिया रिपोर्टनुसार या आलिशान घरात 7 कार पार्किंग स्लॉट उपलब्ध आहेत. माधुरी दीक्षित आपल्या या नव्या घरामुळे प्रचंड आनंदी आहे. अभिनेत्रींचे चाहतेसुद्धा या बातमीमुळे आनंदी झाले आहेत. माधुरी दीक्षितने याबाबत अधिकृत माहिती आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केलेली नाहीय. परंतु ब्ल्यू इंडियाबुल्सने हे फोटो शेअर केले आहेत.