जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sridevi: श्रीदेवींनी 'इंग्लिश-विंग्लिश'मध्ये परिधान केलेल्या साड्यांचा होणार लिलाव; मिळालेल्या रक्कमेचं नेमकं काय होणार?

Sridevi: श्रीदेवींनी 'इंग्लिश-विंग्लिश'मध्ये परिधान केलेल्या साड्यांचा होणार लिलाव; मिळालेल्या रक्कमेचं नेमकं काय होणार?

श्रीदेवी

श्रीदेवी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एक काळ गाजवला आहे. आजही त्यांचे प्रत्येक चित्रपट लोक आवडीने पाहतात.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 ऑक्टोबर-   बॉलिवूडच्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एक काळ गाजवला आहे. आजही त्यांचे प्रत्येक चित्रपट लोक आवडीने पाहतात. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या चित्रपट आणि अभिनयामुळे त्या चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. आपल्या शेवटच्या काळात कमबॅक करत त्यांनी काही खास चित्रपट केले होते. त्यातीलच एक म्हणजे ‘इंग्लिश-विंग्लिश’ होय. हा चित्रपट आणि यातील गाणी प्रचंड चर्चेत आली होती. आज या चित्रपटाला तब्बल 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवसाला खास बनवण्यासाठी या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदेने चाहत्यांसाठी एक खास नियोजन केलं आहे. ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटाचं दशक सेलिब्रेट करण्यासाठी आणि हा खास सोहळा आणखी खास बनवण्यासाठी तसेच श्रीदेवींच्या चाहत्यांना अनोखी भेट देण्यासाठी मराठमोळी दिगदर्शिका गौरी शिंदेने एक अनोखी योजना आखली आहे. ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवींनी परिधान केलेल्या साड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रिपोर्टनुसार, 10 ऑक्टोबरला श्रीदेवी यांच्याशी संबंधित खास गोष्टींचा लिलाव केला जाणार आहे. हे वृत्त समोर येताच त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवी या शशी गोडबोले या मराठमोळ्या स्त्रीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटातून श्रीदेवींनी नेहमीप्रमाणे प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. या चित्रपटातील शशीचा निरागसपणा आणि साधेपणा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या व्यक्तिरेखेचा साधेपणा दाखवण्यासाठी वेशभूषेचा मोठा वाटा होता. यामध्ये श्रीदेवी यांनी सुंदर अशा साड्या परिधान केल्या होत्या. चित्रपटात श्रीदेवींनी परिधान केलेल्या साड्यांचा लिलाव करुन हा दिवस आणखी संस्मरणीय बनवण्याची योजना चित्रपटाच्या टीमने आखली आहे. सर्वांचं लक्ष या अनोख्या योजनेकडं लागून आहे.

News18लोकमत
News18लोकमत

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, दिगदर्शिका गौरी शिंदेनं गेल्या 10 वर्षांपासून, श्रीदेवी यांनी चित्रपटात परिधान केलेल्या साड्या सांभाळून ठेवल्या आहेत. त्या साड्या आजही अगदी सुस्थितीत आहेत. आता चित्रपटाला 10वर्षे पूर्ण झाल्यांनंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास करण्यासाठी, गौरी शिंदेने या साड्या लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीदेवी यांच्या चाहत्यांसाठी या साड्या किती खास असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाहीय. **(हे वाचा:** Ali Fazal And Richa Chadha: अली-रिचाचं मुंबईत ग्रँड रिसेप्शन; कतरिना शिवाय एकटाच पार्टीत पोहोचला विकी कौशल ) या रिपोर्टनुसार, दिगदर्शिका गौरी शिंदेने याबाबत बोलताना सांगितलं की, ‘आम्ही 10ऑक्टोबरला अंधेरीमध्ये या चित्रपटाचं स्क्रीनिंग आयोजित केलं आहे. त्यानंतर उपस्थित चाहत्यांसोबत संवाद साधण्यात येणार आहे. दरम्यान श्रीदेवी यांनी या चित्रपटात परिधान केलेल्या साड्यांचा लिलाव केला जाईल. या साड्या मी गेली दशकभर सांभाळून ठेवल्या आहेत. या लिलावात मिळणारी रक्कम आम्ही मुलींच्या शिक्षणासाठी एका एनजीओला देणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात