मुंबई, 06 जुलै : बॉलिवूडच्या दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांनी इंडस्ट्रीतील जवळजवळ प्रत्येकच सुपरस्टारला आपल्या तालावर नाचवलं आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास बॉलिवूडच्या प्रत्येक मोठ्या सुपरस्टारची कोरिओग्राफी केली होती. सरोज खान यांच्या नृत्यदिग्दर्शनाशिवाय बॉलीवूड चित्रपट अपूर्ण मानले जात होते. आपल्या करिअरमध्ये त्यांना अशा स्टार्सनाही डान्स शिकवावा लागला, ज्यांना अजिबातच डान्स करता येत नव्हता. असाच एक अभिनेता म्हणजे संजय दत्त, ज्याचा डान्स पाहून कोरिओग्राफर सरोज खान बेशुद्धच पडल्या होत्या. काय होता तो किस्सा जाणून घ्या. सरोज यांनी त्यांच्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितलं होता. तसेच त्यांनी असे डान्सर्स ज्यांना अजिबातच डान्स करता येत नाही अशा नॉन-डान्सर्सना डान्स शिकवायला जास्त आवडतं, असा खुलासा देखील केला होता. इंडस्ट्रीत देखील असे काही अभिनेते होते ज्यांना अजिबातच डान्स करता येत नव्हता त्यांना देखील सरोज यांनी नाचायला भाग पाडलं. बॉलिवूडमधील गोविंदा, अक्षय कुमार, आमिर खान यांसारख्या स्टार्सना डान्स शिकवणं सोपं होतं, कारण त्यांना आधीच चांगला डान्स करता यायचा. परंतु जेव्हा संजय दत्त आणि सैफ अली खान यांना नृत्य शिकवण्याची वेळ यायची तेव्हा जास्त मजा यायची असा खुलासा सरोज यांनी केला होता. यासोबतच सरोज खान यांनी एक असाच धमाल किस्सा देखील सांगितलं होता.
ही घटना 1990 साली ‘ठाणेदार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. यावेळी संजय दत्तचा अतरंगी डान्स पाहून सरोज खान थक्क झाल्या होत्या. सरोजने या चित्रपटातील ‘तम्मा-तम्मा लोगो’ हे गाणे कोरिओग्राफ केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एक प्रँक झाल्याचे सरोजने सांगितले होते. संजय दत्तने या गाण्यासाठी रिहर्सल केलेली नाही आणि आता तुम्हाला कोरिओग्राफ करता येणार नाही, असे तिला सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी संजयचा डान्स पाहिल्यावर त्या थक्क होऊन खुर्चीवरून खाली पडल्या. याचं कारण, संजय दत्त नॉन डान्सर असताना त्याने खरोखरच खूपच दमदार डान्स केला होता. नंतर ते गाणंही हिट झालं आणि संजयने त्या गाण्यात केलेल्या डान्सने इतिहास रचला. Sushmita Sen Daughter: सुष्मिता सेनची 13 वर्षांची लेक सोशल मीडियावर होतेय ट्रोल; कारण वाचून व्हाल हैराण या काळात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरची बरीच चर्चा व्हायची. चाहते दोघांच्या जोडीला भरभरून प्रेम देत असत. दोघेही ठाणेदारच्या सेटवर भेटले होते आणि तिथूनच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण 1991 मध्ये आलेल्या ‘साजन’ चित्रपटाने त्यांच्यातील जवळीक आणखी वाढवली. जेव्हा-जेव्हा दोघे एकत्र दिसले तेव्हा त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच दहशत निर्माण केली होती. माधुरी आणि संजयची ऑनस्क्रीन जोडी लोकांना खूप आवडायची. लोक त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडप्यासाठी शुभेच्छा देऊ लागले होते. त्या काळात त्यांच्या अफेअरची खूप चर्चा व्हायची. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.