मुंबई, 3 फेब्रुवारी- Madhubala’s Sister Kaniz Balsara: हिंदी सिनेमातील सर्वांत सुंदर अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांना ‘व्हीनस ऑफ हिंदी सिनेमा’ (Venus of Indian cinema) असं म्हटलं जाते. त्यांची चित्रपट कारर्किदी छोटी होती मात्र उल्लेखनीय राहिली. वयाच्या 36 व्या वर्षी 23 फेब्रुवारी1969 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 11 भांवडात मधुबाला या पाचव्या होत्या. मधुबाला यांची 96 वर्षीय बहीण कनिझ बलसारा (Kaniz Balsara) यांच्याविषयी एक चिंता वाढवणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईटाइम्सने एका एक्सक्लुझिव्ह स्टोरीमध्ये सांगितले आहे की, कनिज बलसारा या ऑकलॅंडहून मुंबईत आल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते शिवाय कुणाचाही आधार देखील नाही. कनिझ बलसारा यांना त्यांची सूनबाई समिना हिने विमानात बसवले. कनिज 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मुंबईत आल्या आहेत. मुंबईतील वांद्रे भागात राहणारी कनीजची मुलगी परवेज हिला समिना नव्हे, तर चुलत भावाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती. वाचा- नाईलाज म्हणून अभिनय क्षेत्रात आली ही अभिनेत्री,म्हणाली-आई सिंगल मदर असल्यामुळे.. मधुबाला यांच्या भावाची मुलगी परवेजने ईटाइम्सला सांगितले की, ‘कनिझ या 17-18 वर्षांपूर्वी तिच्या पतीसोबत न्यूझीलंडला गेल्या होत्या. कारण ती तिचा मुलगा फारूकवर इतकं प्रेम करत होती की, ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. माझ्या भावाचेही आईवर खूप प्रेम होते. आमच्या पालकांना तो न्यूझीलंडला घेऊन गेला जेव्हा ते तिथे गेले. ते अतिशय आदरणीय व्यक्ती होते. न्यूझीलंडमध्ये करेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. पण माझी वहिनी समिना आमच्या आई-वडिलांना पसंत करत नव्हती. वाचा- ‘माझा फोटो फोटोशॉप करुन Vulgar Photo बनवला’,घडल्या प्रकारानंतर अभिनेत्रीचा संताप मधुबालाची लहान बहिणीला बसला धक्का त्यांनी सांगितले की, कनीझच्या सुनेनं कधीच माझ्या आई वडिलांसाठी स्वयंपाक बनवला नव्हता. माझा भाऊ फारूकला त्यांच्यासाठी बाहेरून जेवण आणावं लागत होते. या आठ जानेवारीला भावाच मृत्यू झाल्यानंतर समीनाने त्यांचे हाल करण्यास सुरूवात केली. माझा भाऊ आम्हाला सोडून एक महिनाही झाला नाही.’ त्याचवेळी माझ्या बहिणीला अशी वागणूक मिळाल्याने मला धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.