मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नाईलाज म्हणून अभिनय क्षेत्रात आली ही प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली- आई सिंगल मदर असल्यामुळे...

नाईलाज म्हणून अभिनय क्षेत्रात आली ही प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली- आई सिंगल मदर असल्यामुळे...

सध्या ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी विविध विषयांवरील तिची परखड मतं मात्र चर्चेत असतात. ती उत्तम लेखिका म्हणूनही परिचित आहे.

सध्या ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी विविध विषयांवरील तिची परखड मतं मात्र चर्चेत असतात. ती उत्तम लेखिका म्हणूनही परिचित आहे.

सध्या ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी विविध विषयांवरील तिची परखड मतं मात्र चर्चेत असतात. ती उत्तम लेखिका म्हणूनही परिचित आहे.

    मुंबई, 03 फेब्रुवारी: एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना (Superstar Rajesh Khanna) आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची कन्या तसंच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची (Akshay Kumar Wife) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या ती बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी विविध विषयांवरील तिची परखड मतं मात्र चर्चेत असतात. ती उत्तम लेखिका म्हणूनही परिचित आहे. नुकतंच एका प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री करिना कपूरने ट्विंकल खन्नाशी खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर संवाद साधला. 'मला नाइलाजानं अभिनय क्षेत्रात यावं लागलं', असा खुलासा यावेळी ट्विंकल खन्नानं केला. या वेळी करिना कपूरनेही तिच्या खासगी आणि अभिनयाच्या प्रवासाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

    अभिनेत्री ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया आणि सुपरस्टार राजेश खन्ना हे दोघं 1973 मध्ये विवाहबद्ध झाले होते. मात्र 1982 मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दांपत्याला ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली आहेत. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना विभक्त झाल्यावर ट्विंकल आणि रिंकी आईसोबत राहू लागल्या. ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमार जानेवारी 2001 मध्ये विवाहबद्ध झाले. या दांपत्याला आरव आणि नितारा ही दोन मुलं आहेत. अभिनय क्षेत्रापासून दूर जाऊन लेखिका बनलेल्या ट्विंकल खन्नाने नुकताच ट्विक इंडिया प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री करिना कपूरशी संवाद साधला. यावेळी तिनं तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

    हे वाचा-आणखी एक लग्न आणि हॅपी एंडिंग! येऊ तशी कशी मी...मालिका संपणार?

    'मला अभिनय हे प्रोफेशन नाईलाजानं निवडावं लागलं. कारण माझी आई सिंगल मदर (Single Mother) होती,' असं यावेळी ट्विंकल खन्नानं सांगितलं. करिअरविषयी बोलताना करिना म्हणाली की, 'अभिनेत्री होण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक कलाकार असणं आवश्यक आहे. लोकांना ही वाटचाल सोपी वाटत असली तरी मला वाटतं ती खूप अवघड असते.' यावर ट्विंकलने, 'मलाही हे सोपं वाटत नाही, मी ते करू शकले नाही,' अशी प्रतिक्रिया दिली.

    करिअर चॉईसविषयी बोलताना ट्विंकल म्हणाली की, 'करिना, मला माहिती आहे की ती तुझ्यासाठी ही निवड होती पण माझ्यासाठी नव्हती. मला खरंच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. मी गरजेपोटी हा मार्ग स्वीकारला. माझी आई सिंगल मदर होती. ती सर्वांच्या खर्चाचा भार उचलत असे. मला वाटतं की करिश्मा कपूर (Karishma Kapoor) अर्थात लोलोची स्थिती काहीशी तशीच असेल. तिला देखील कॉलेज सोडून अभिनयक्षेत्रात यावं लागलं. आपण फार कमी वयात या क्षेत्रात उतरलो. त्यावेळी फॅमिलीला सपोर्ट करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग होता,' असं ट्विंकल खन्नानं स्पष्ट केलं.

    हे वाचा-BhabijiGharParHainला नेहा पेंडसेचा अलविदा, 'ही' अभिनेत्री साकारणार भाभीचा भूमिका

    यावेळी ट्विंकलने करिनाला विचारलं की, 'कपूर घराण्यात मुलींना चित्रपटात काम करण्याची परवानगी नसल्यानं तुला चित्रपटात काम करायचं आहे, हे तू कुटुंबीयांना कसं पटवून दिलंस?' यावर करिना म्हणाली की, 'माझी आई खूप सपोर्टिव्ह आहे. करिश्मा कपूर अर्थात लोलो ही अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिते हे जेव्हा आमच्या वडिलांना समजलं, तेव्हा ते काहीसे दुःखी झाले. पण ते मोकळ्या विचारांचे आहेत, ही बाब बहुतांश लोकांना माहिती आहे. ते वडिलांपेक्षा आमचे चांगले मित्र आहेत.' यावेळी ट्विंकल खन्ना आणि करिना कपूरने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या.

    First published:

    Tags: Kareena Kapoor, Twinkle khanna