मुंबई, 03 फेब्रुवारी: मल्याळम चित्रपटसृष्टीसह (Malyalam Films) तमिळ चित्रपटात (Tamil Films) सुपरस्टार रजनीकांतबरोबर झळकलेली देखणी अभिनेत्री मालविका मोहनन (Malvika Mohanan) आपल्या सौंदर्यासाठी आणि उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते असून, तिच्या फोटो आणि व्हिडीओजना भरभरून दाद देत असतात. अनेक विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडणाऱ्या मालविकानं नुकत्याच तिच्या फोटोच्या गैरवापराबद्द्ल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मालविका मोहननचा एक फोटो फोटोशॉप (Photoshop) करण्यात आला असून, अनेक माध्यमांनी वापरल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. हा तिचा खरा फोटो नसून, मूळ फोटोत बदल करून हा अश्लील (Vulgar) फोटो तयार केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. या फोटोबाबत कोणतीही शहानिशा न करता तो वापरणं ही चीप पत्रकारिता असल्याचे ताशेरे तिनं ओढले आहेत. मालविकाने आपल्या ट्विटर हँड्लवर (Twitter Handle) याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे तिचा एक फोटो फोटोशॉप करुन अश्लील फोटो तयार करण्यात आला आणि काही मीडिया हाऊसेसनी तो सगळीकडे शेअर केला.
This is a photo of mine from a few months back which somebody has photoshopped and created a fake vulgar one. A lot of people have been circulating that including media houses like @AsianetNewsTM , which is just cheap journalism. If you see the fake one please help & report. pic.twitter.com/y9QXDf5HHf
— Malavika Mohanan (@MalavikaM_) February 2, 2022
तुम्हाला माझा हा फोटो कुठे दिसला तर त्याबाबत तक्रार करा, असं आवाहन तिनं चाहत्यांना केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या मालाविकाने आपले अत्यंत आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या एका फोटोवरून तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मालविका आपल्या या फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. हे वाचा- Pushpa ने थलायवाला टाकलं मागे! अल्लूचे रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स मल्याळम चित्रपटापासून सुरुवात करणाऱ्या या देखण्या अभिनेत्रीनं गेल्या वर्षी रजनीकांत यांच्या पेट्टा (Petta) या चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण केलं आहे. तामिळ चित्रपट ‘मास्टर’मध्येही तिनं काम केलं आहे. नुकतेच तिनं धनुषसोबत ‘मारन’ या तमिळ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. कार्तिक नरेन दिग्दर्शित या चित्रपटात धनुष पत्रकाराच्या भूमिकेत असून, डिस्ने+ हॉटस्टारवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. काही वर्षापूर्वी मालविकानं बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपलं नशीब आजमावलं होतं. 2017 मध्ये ती इशान खट्टरसोबत (Ishan Khattar) बियॉन्ड द क्लाउड्स या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही. हे वाचा- नाईलाज म्हणून अभिनय क्षेत्रात आली ही अभिनेत्री,म्हणाली-आई सिंगल मदर असल्यामुळे.. गेल्या वर्षी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की, ‘मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे केवळ बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मिळतील ते चित्रपट करतात. बियॉन्ड द क्लाउड्सनंतर मलाही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या पण जोपर्यंत मला मनापासून एखाद्या चित्रपटात काम करावंस वाटत नाही, तोपर्यंत मी होकार देत नाही. मी कुठेतरी वाचले आहे की, आपण नेहमी आयुष्याच्या पुढच्या टप्प्याबद्दल इतका विचार करतो की वर्तमानात जगणं आणि आनंद घेणं विसरून जातो. सध्या तमिळ चित्रपटसृष्टीत मला मिळालेल्या यशाचा आनंद अनुभवत आहे, बॉलिवूडमध्येही माझ्यासाठी काही चांगल्या गोष्टी घडत आहेत.’