मुंबई, 30 एप्रिल- शाहरुखच्या स्टारडमपेक्षाही जर कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती म्हणजे त्याच्या विनोदबुद्धीची. बॉलिवूडचा हा बादशहा त्याच्या टायमिंगसाठी ओळखला जातो. अनेकदा तो सोशल मीडियावर त्याच्या विनोदबुद्धीची झळक देत असतो. बाप होण्याच्या वाईट गोष्टीही तो ट्विटरवर शेअर करत असतो. नुकतंच त्याने याचसंदर्भातलं एक ट्वीट केलं. काल 29 एप्रिलला मुंबईत झालेल्या मतदानावेळी शाहरुख त्याच्या पाच वर्षाच्या मुलाला अब्रामला घेऊन गेला होता. शाहरुख, गौरी आणि अब्रामचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दीपिकानं नाकारलेले सलमानचे ‘हे’ सिनेमे ठरले सुपरहिट तोच फोटो ट्विटरवर शेअर करत शाहरुखने लिहिले की, ‘अब्रामला बोटिंग आणि वोटिंग या शब्दात संभ्रम होता. त्याच्या मनातला हाच संभ्रम दूर करण्यासाठी आणि दोन शब्दातला फरक समजवण्यासाठी त्याला मतदानाला घेऊन गेलो होतो.’
Little one was a bit confused between ‘Boating’ and Voting, so took him along to experience the difference. pic.twitter.com/8X6DsTP8bc
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 29, 2019
‘तुला पाहते रे’मध्ये ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री बॉलिवूडच्या बादशहानेच नाही तर संपूर्ण बच्चन कुटुंबिय, प्रियांका चोप्रा, सलमान खान, माधुरी दीक्षित, आमिर खान, कंगना रणौत आणि करिना कपूरसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान काल २९ एप्रिलला पार पडलं. महाराष्ट्रातील १७ जागांसाठी हे मतदान करण्यात आलं. यावेळी प्रियांका चोप्रा, प्रिया दत्त, लारा दत्त, आमिर खान आणि किरण राव यांनी सकाळी जाऊन मतदान करण्याला प्राधान्य दिलं. ‘नाणं एकदम खणखणीत’, गॉडफादर नसतानाही ‘हे’ सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये यशस्वी तर काही स्टार किड्ससाठी हा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा होता. करिना कपूरसोबत तैमुर अली खानही मतदान केंद्राकडे आला होता तर काजोल आणि अजय देवगणसोबत युग आला होता. तसेच शाहरुखसोबत अब्राम आला होता. कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT