'तुला पाहते रे'मध्ये 'या' अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री

'तुला पाहते रे'मध्ये 'या' अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री

शिल्पा तुळसकर राजनंदिनीची भूमिका साकारतेय. तर तिचा लहान भाऊ म्हणजे छोटा जयदीप कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : तुला पाहते रे मालिका आता एकदम रंजक वळणावर आलीय. आजपासून ( 30 एप्रिल ) मालिकेत राजनंदिनीची एंट्री होतेय. विक्रांतची राजनंदिनी पहिली बायको. ते कसे भेटले, कसं प्रेम जुळलं या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहेत. त्याचबरोबर राजनंदिनीचं आयुष्यही उलगडत जाणार आहे.

शिल्पा तुळसकर राजनंदिनीची भूमिका साकारतेय. तर तिचा लहान भाऊ म्हणजे छोटा जयदीप कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. छोटा जयदीप साकारतोय मल्हार भावे. म्हणजेच अभिनेता सुबोध भावेचा मुलगा. मालिकेत त्याची पहिलीच एंट्री आहे.

मध्यंतरी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत डाॅ. अमोल कोल्हे यांच्या मुलीनंही छोटी भूमिका साकारली होती.

बरेच दिवस ईशा आणि विक्रांतच्या गोड प्रेमाचा ओव्हरडोस झाला होता. आता विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. इतकंच काय तर विक्रांतचं खरं नाव गजा पाटील असल्याचंही उघड झालंय.

सरंजामेंच्या कंपनीत फ्राॅड झाला. तो करणाऱ्या व्यक्तीचं नाव ईशानं शोधून काढलं. ते म्हणजे गजा पाटील. विक्रांत आणि झेंडेंना तो एक धक्काच होता. हे नाव आईसाहेबांना कळलं की सगळंच उघड होणार. त्यामुळे विक्रांत घाबरलाय.

'नाणं एकदम खणखणीत', गॉडफादर नसतानाही 'हे' सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये यशस्वी

विकी कौशलशी ब्रेकअपनंतर हरलीन सेठीनं दिली 'ही' प्रतिक्रिया

विक्रांतचं आणखी एक नवं रूप येतं समोर

राजनंदिनी आईसाहेबांची सावत्र मुलगी. जयदीपची बहीण. घरी सगळ्यांनाच तिचा लळा. अख्खं घर तिच्यावर जीव ओवाळून टाकत असतानाच अचानक तिचं निधन झालं. आता भूतकाळातल्या एकेक गोष्टी समोर येणार आहेत.

इतका मोठा विश्वासघात केल्यामुळे ईशा पुरती मनाने तुटते. खचून जाते. अशीच एकदा भेदलेल्या अवस्थेत ईशा रस्त्यातून जात असताना ट्रक उडवणार तोच जोगतीण तिचा हात खेचते आणि तिला वाचवते. तसंच ईशाचा जन्म हा एका उद्देशाने झाल्याचे ती आठवण करून देते. समोर ठेवलेल्या परातीतल्या पाण्यात ती ईशाला बघायला सांगते. ईशा परातीत बघते आणि तिला राजनंदिनीचा चेहरा दिसतो.

ईशा हीच राजनंदिनी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न विक्रांत सरंजामे करत असताना, ती खरीच गेल्या जन्मी राजनंदिनी होती, असं मालिकेत दाखवलंय. त्यामुळे आता या मालिकेत ईशाच डाॅमिनेटिंग होणार.

First published: April 30, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading