जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मतदान केंद्रावर वरुण धवनने केली वृद्ध महिलेची मदत, उपस्थित म्हणाले वाह.. वाह...

मतदान केंद्रावर वरुण धवनने केली वृद्ध महिलेची मदत, उपस्थित म्हणाले वाह.. वाह...

मतदान केंद्रावर वरुण धवनने केली वृद्ध महिलेची मदत, उपस्थित म्हणाले वाह.. वाह...

मतदान केल्यानंतर वरुण जेव्हा केंद्रातून बाहेर पडला तेव्हा एक वृद्ध महिला पायरी चढण्याचा प्रयत्न करताना त्याला दिसली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 29 एप्रिल- लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांना सकाळपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील 17 लोकसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. यावेळी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सारेच आपला हक्क बजावताना दिसत आहेत. सेलिब्रिटींच्या या यादीत अभिनेता वरुण धवनच्या नावाचा सहभाग आहे. फक्त बॉलिवूड स्टारच नाही तर या मराठी सेलिब्रिटींनीही केलं मतदान वरुणचं नाव आम्ही यासाठी वेगळं घेतोय, कारण त्याने मतदान केंद्रावर असं काही केलं की सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे. सध्या वरुणचे फक्त मतदान केल्याचेच फोटो सोशल मीडियावर शेअर होत नाहीयेत तर एका वृद्ध महिलेला मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्याने मदत केली ते फोटो व्हायरल होत आहेत.

    जाहिरात

    त्याचे झाले असे की, वरुण त्याचे वडील डेविड धवन आणि पूर्ण कुटुंबासोबत मतदान करायला पोहोचला होता. मतदान केल्यानंतर वरुण जेव्हा केंद्रातून बाहेर पडला तेव्हा एक वृद्ध महिला पायरी चढण्याचा प्रयत्न करताना त्याला दिसली. वरुणने त्यांना पाहिले आणि तो लगेच त्यांना मदत करण्यासाठी पोहोचला. कॅटवॉक करतानाच चक्कर येऊन जागी कोसळला मॉडेल, रॅम्पवरच झाला मृत्यू वरुण धवन जसा त्या वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी पोहोचला तशी प्रसार माध्यमांच्या नजराही त्याच्याकडे वळल्या. यामुळेच वृद्ध महिलेची मदत करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये ती वृद्ध महिला वरुणला आशीर्वाद देताना दिसत आहे. हे फोटो पाहून प्रत्येकजण त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत प्रियांका चोप्रापासून रेखा, अजय देवगण, आमिर खान आणि माधुरी दीक्षितसारख्या अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलं. ट्विंकलचा राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियासोबतचा हा फोटो पाहिला नाहीत तर काय पाहिलं? वरुणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच त्याचा कलंक सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. लवकरच तो स्ट्रीट डान्स ३ सिनेमातही दिसणार आहे. सध्या वरुण त्याच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लवकरच तो त्याची प्रेयसी नताशा दलालशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. डेविड यांनी एका मुलाखतीत वरुणचं लग्न पुढच्या वर्षी होणार असल्याचं म्हटलं. VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीब

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात