मुंबई, 8 मे : कोरोना व्हायरसनं सर्वांचं जगण कठीण करून सोडलं आहे. या व्हायरसमुळे देशभरात डॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे संपूर्ण देशच ठप्प झाला आहे. अर्थात याचा परिणाम खेळ आणि मनोरंजन क्षेत्रावरही झाला. जे सिनेमा तयार आहेत त्यांना रिलीज करण शक्य नाही. जे तयार केले जात होते त्यांचं शूटिंग बंद झालं. एवढंच काय तर टीव्ही शोचं शूटिंग सुद्धा बंद झालं आहे. त्यामुळे टिव्हीवर नवे एपिसोड येणं बंद झालं आहे. वेळ निघून जात आहे. इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनाचं संक्रमण वाढताना दिसत आहे.
कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता ही परिस्थित लवकर आटोक्यात येईल असं अजिबात वाटत नाही. पण अशातही टीव्ही शो मेकर्सनी अशी सोय केली आहे की तुम्ही तुमचे आवडते शो घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. 'कौन बनेगा करोडपती', 'घर घर सिंगर', माधुरी डान्स शो 'डान्स दीवाने' यासारखे मोठे रिअलिटी शो लवकरच टीव्हीवर सुरू होणार आहेत. मेकर्सनी या शोच्या कमबॅकची पूर्ण तयारी केली आहे.
लॉकडाऊनमध्ये शेवंता विकतेय पाणीपुरी, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
कौन बनेगा करोडपती
अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित कौन बनेगा करोडपती हो शो पुन्हा एकदा सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. हा केबीसीचा 12 वा सीझन असणार आहे. विशेष म्हणजे या शोचा प्रोमो रिलीज झाला असून अमिताभ बच्चन यांनी या प्रोमोचं शूट घरीच केलं आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी केबीसी 12 चं रजिस्ट्रेशन 9 मे पासून सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे.
रोडीज
दुसरीकडे रोडीजसाठीही ऑनलाइन ऑडिशनच्या जाहिराती वेबसाइट आणि टीव्हीवर सुरू करण्यात आल्या आहेत. मेकर्सनी याची ऑनलाइन एंट्री मागवायला सुरुवात केली आहे. रोडीज हा पहिल्यापासूनच सर्वाधिक चर्चेत राहिलेला शो आहे त्यामुळे एमटीव्ही लॉकडाऊनमध्येही या शोचा नवा सीझन घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
घर घर सिंगर
नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर हे झी टीव्हीचा नवा शो घर घर सिंगरमध्ये सहभागी होणार आहेत. या शोमध्ये त्यांच्यासोबत सोनू कक्कर सुद्धा असणार आहे. या शोमध्ये कक्कर भाऊ बहीण मिळून लॉकडाऊनमधला देशाचा पहिला सिंगिंग सुपरस्टार शोधणार आहेत. या शोमध्ये स्पर्धक त्यांच्या घरूनच ऑडिशन देतील पण यासोबतच या नेहा, टोनी आणि सोनू यांची लाइफस्टाइल सुद्धा सर्वांना पाहायला मिळणार आहे.
...आणि जखमी अवस्थेत अमिताभ बच्चन पोहोचले ऋषी कपूर यांच्या लग्नात!
डान्स दीवाने
लॉकडाऊनध्ये सुरू होणाऱ्या शोमध्ये कलर्सचा डान्स दिवाने हा टीव्ही शो सुद्धा असणार आहे. या शोच्या ऑनलाइअन ऑडिशन सुद्धा सुरु झाल्या आहेत. ऑडिशनचा व्हिडीओ स्पर्धक वूटच्या वेबसाइटवर अपलोड करू शकतात. फक्त यात अट अशी आहे की हा व्हिडीओ 50 एमबीपेक्षा जास्त नसावा.
(संपादन- मेघा जेठे.)
रवीना टंडनला चाहत्यानं केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्रीनंही दिलं धम्माल उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Tv shows