मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लॉकडाऊनमध्ये शेवंता विकतेय पाणीपुरी, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

लॉकडाऊनमध्ये शेवंता विकतेय पाणीपुरी, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी शेवंता लॉकडाऊनमध्ये चक्क पाणीपुरी विकत आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी शेवंता लॉकडाऊनमध्ये चक्क पाणीपुरी विकत आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी शेवंता लॉकडाऊनमध्ये चक्क पाणीपुरी विकत आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 8 मे : सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांना घरी राहावं लागत आहे. पण अशातही आपले लाडके सेलिब्रेटी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करायचं विसरलेले नाहीत. सर्वजण सध्या सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत आणि रोज काही ना काही व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांचं मनोरंज करत आहेत. त्यांच्याशी लाइव्ह चॅटमधून संवाद साधताना दिसत आहे. मात्र रात्रीस खेळ चाले या मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी शेवंता लॉकडाऊनमध्ये चक्क पाणीपुरी विकत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

‘रात्रीस खेळ चाले 2’ या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा सोशल मीडियावर तगडा चाहता वर्ग आहे. सध्या अपूर्वाच्या मालिकेच शूटिंग थांबल्यानं ती सुद्धा घरी आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालत आहे. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती पाणीपुरी विकताना दिसत आहे.

अर्थात शेवंता सुद्धा तुमच्या आमच्यासारखीच घरी आहे आणि घरच्या घरी तिनं पाणीपुरी तयार केली आहे. ज्याचा एक गमतीदार व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा अगदी स्ट्रीट स्टाइलमध्ये खांद्यावर रुमाल टाकून हुबेहूब पाणीपुरीवाल्याची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर पाणीपुरीच्या आठवणीनं तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल हे देखील नक्की आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही.

View this post on Instagram

When me n my niece are CHAT addicts... Similar taste buds... ❤️ . . @shwetanemlekar #apurvanemlekar #babyadika #myniece

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

अपूर्वा सध्या ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. याआधीही अपूर्वानं काही मालिकांमध्ये काम केलं होतं मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतून. सध्या कोरोना व्हायरसमुळे या मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Ratris khel chale