कंगनाच्या Lock Upp मध्ये डबल धमाका! जेलमधून बाहेरचा रस्ता दाखवलेले हे कैदी परतले पण...
कंगनाच्या Lock Upp मध्ये डबल धमाका! जेलमधून बाहेरचा रस्ता दाखवलेले हे कैदी परतले पण...
जुने कैदी सायशा आणि करणवीर परतल्यावर कंगनाच्या जेलमधील या कैद्यांना विशेष आनंद झाला आहे
Lock Upp शोमधून लॉक आऊट झालेले अर्थात ज्यांना जेलबाहेर जावं लागलं होतं ते दोन सेलेब्रिटी पुन्हा एकदा परतले आहेत. पण यामध्येही एक ट्विस्ट असणार आहे. तर हे कैदी आहेत- सायशा शिंदे आणि करणवीर बोहरा.
मुंबई, 03 एप्रिल: एकता कपूरच्या ALT Balaji या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारा लॉकअप या शोमध्ये नवा ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा शो 'लॉक अप' (Kangana Ranaut Lock Upp) ओटीटीवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे. या शोला मिळणारी Viewership दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या शोचे लेटेस्ट प्रोमोज उत्कंठा आणखी वाढवणारे आहेत. या शोमधून लॉक आऊट झालेले अर्थात ज्यांना जेलबाहेर जावं लागलं होतं ते दोन सेलेब्रिटी पुन्हा एकदा परतले आहेत. पण यामध्येही एक ट्विस्ट असणार आहे. तर हे कैदी आहेत- सायशा शिंदे आणि करणवीर बोहरा (Saisha Shinde and Karanvir Bohra has returned to Lock Upp). या दोघांची शोमधून एक्झिट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना परत आणावं अशी मागणी जोर धरू लागली होती. आता हे दोघे या शोमध्ये परतले आहे. पण ते दोघजणं शोमध्ये परतण्यामध्ये एक ट्विस्ट आहे.
हे वाचा-अंकिता लोखंडे म्हणाली मी प्रेग्नंट आहे.... कंगनाच्या Lock Upp मध्ये काय केला खुलासा?काय आहे लॉकअपमधला नवा ट्विस्ट?
लॉकअप अरिनामध्ये जो एक टास्क गेल्या आठवड्यात खेळण्यात आला त्यामध्ये ब्लू ब्लॉकने बाजी मारली होती. त्यामुळे 'झोल घर'मध्ये जाण्याची संधी ब्लू टीमपैकी एका सदस्याला मिळाली. हा सदस्य अंजली अरोरा (Anjali Arora in Lock Upp) आहे. मात्र यावेळी 'झोल घर'मध्ये जाऊन ऑफर्स मिळवायच्या नव्हत्या तर सर्वांसमक्ष अंजलीला या ऑफर्स देण्यात आल्या. त्यामुळे हे सायशा आणि करणवीर गेममध्ये राहणार की नाही हे आता अंजलीच्या हातात आहे.
ALT Balaji कडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आधी सायशा लॉक अपमध्ये पुन्हा एंट्री घेते आणि नंतर करणवीर. आता कंगनाने गेममध्ये असा ट्विस्ट आणला आहे की, या दोघांना जर ब्लू टीममध्ये जायचं असेल तर त्यांच्या टीममधील एक कैदी ऑरेंज टीममध्ये पाठवला लागेल. पण कोण कैदी जाणार हे कंगना ठरवणार आहे.
जुने कैदी सायशा आणि करणवीर परतल्यावर कंगनाच्या जेलमधील या कैद्यांना विशेष आनंद झाला आहे. सायशाची जेलमधील रिएंट्री देखील धमाकेदार होती. तिने 'बोले चुडीयाँ..' गाण्यावर परफॉर्म करत जेलमध्ये एंट्री केली. यावेळी सर्वांनाच आनंद झाला होता. पण आता हा आनंद किती वेळ टिकतो हे पाहणं रंजक ठरेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.