मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अंकिता लोखंडे म्हणाली मी प्रेग्नंट आहे.... कंगनाच्या Lock Upp मध्ये काय केला खुलासा?

अंकिता लोखंडे म्हणाली मी प्रेग्नंट आहे.... कंगनाच्या Lock Upp मध्ये काय केला खुलासा?

'लॉक अपच्या' शनिवारच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री कंगना रणौतची खास मैत्रिण अंकिता लोखंडे (Ankita Lokhande in Lock Upp) हिने हजेरी लावली होती. यावेळी तिने एक सीक्रेट या शोमध्ये रीव्हिल केले

  मुंबई, 03 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा शो 'लॉक अप' (Kangana Ranaut Lock Upp) ओटीटीवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे. या शोला मिळणारी Viewership दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या शोची खास बाब म्हणजे यातील स्पर्धकांवर एक वेळ अशी येते की त्यांना त्यांचे 'डार्क सीक्रेट' (Lock Upp Secret) कधी ना कधीतरी सांगावे लागते. आजपर्यंत अनेक स्पर्धकांना या परीक्षेतून जावे लागते आहे. दरम्यान अलीकडेच समोर आलेल्या एका प्रोमोनुसार चक्क या शोमध्ये आलेल्या पाहुण्या कलाकारालाच तिचे सीक्रेट सांगावे लागले आहे. 'लॉक अपच्या' शनिवारच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री कंगना रणौतची खास मैत्रिण अंकिता लोखंडे (Ankita Lokhande in Lock Upp) हिने हजेरी लावली होती. अंकिता लोखंडे याठिकाणी तिची ALT Balaji वरील अपकमिंक सीरिज 'पवित्र रिश्ता'च्या प्रमोशनसाठी आली होती. दरम्यान यावेळी तिने तिचे असे सीक्रेट रीव्हिल केले की जे ऐकून कंगनालाही धक्का बसला होता. हे वाचा-'जयदीप'ची खऱ्या आयुष्यातील 'गौरी' आहे खूपच ग्लॅमरस, हिंदी मालिकांमध्ये केलंय काम अंकिता लोखंडे आहे प्रेग्नेंट? यावेळी गेस्ट म्हणून आलेल्या अंकिताला कंगना असं म्हणते की याठिकाणी जो कुणी येतो त्याला त्याच्याशी संबंधित एक सीक्रेट सांगावे लागते. पहिल्यांदा अंकिता कोणतही सीक्रेट नाही असंच सांगते. पण कंगनाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर ती म्हणते की, 'ही गोष्ट विकीला देखील नाही माहित. माझं अभिनंदन करा मित्रांनो मी प्रेग्नेंट आहे.' (Ankita Lokhande Pregnant?) हे ऐकून कंगनासह सर्व कंटेस्टंट्स शॉक होतात. कंगना देखील खूप आनंदी होऊन तिला मिठी मारते. त्यानंतर मात्र अंकिता म्हणते की, 'एप्रिल फुल बनवलं..' प्रोमोच्या व्हिडीओमध्ये केवळ अंकिता सीक्रेट रीव्हिल करते तोपर्यंतचाच पार्ट दाखवण्यात आला आहे.
  कंगना यानंतर अंकिताला म्हणते की, 'अशी आशा करते की हे खोटं सीक्रेट लवकरच खरं होईल.' त्यावर अंकिताही म्हणते की, 'लवकरच होईल.' अंकिताने 14 डिसेंबर 2021 रोजी तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड विकी जैनसह लग्न केले आहे. हे कपल सध्या स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी या कार्यक्रमात स्पर्धक आहेत. शिवाय अंकिताचा नवी सीरिज 'पवित्र रिश्ता' लवकरच ALT Balaji वर पाहायला मिळणार आहे. दरम्यान या व्हिडीओच्या सुरुवातीला अंकिताने मुनव्वर फारुकी आणि अंजली शर्मा यांच्या मैत्रिचं कौतुक केलं आहे. ते दोघं एकत्र क्यूट दिसतात असंही ती म्हणाली आणि तिने त्यांना काही गिफ्ट्सही दिले आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Ankita lokhande, Kangana ranaut

  पुढील बातम्या