मुंबई 5 जुलै: रणवीर सिंग (Ranveer Singh) हा बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वात आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडच्या या बाजीरावचा आज वाढदिवस आहे. (Ranveer Singh birthday) रणवीरचा जन्म 1985 साली मुंबईत झाला होता. 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आज तो यशाच्या शिखरावर आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारली आहे. अवघ्या 10 वर्षांत रणवीरने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. (Ranveer Singh Unknown facts) अशा या बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ...
‘...तर मग मुलाचा धर्म हिंदू होणार का?’ आमिरच्या घटस्फोटावर कंगना रणौतचा सवाल
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रणवीरने त्याचं नाव बदलण्याचा विचार केला होता. रणबीर कपूरशी हे नाव साधर्म्य असल्याने त्याला अनेकांनी नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.
बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करण्यापूर्वी त्याने एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीत कॉपी-रायटरची नोकरीसुद्धा केली होती.
‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट स्विकारण्यापूर्वी त्याने तीन इतर चित्रपट नाकारले होते.
‘टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे चित्रपट मिळत नाही’; रिद्धीने केली बॉलिवूडची पोलखोल
रणवीर हा अभिनेत्री सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे.
दमदार अभिनय आणि अफलातून डान्सरसोबतच रणवीर उत्तम रॅपरही आहे.
‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या आधी रणवीरला विचारण्यात आलं होतं. मात्र, इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने रणवीरने हा चित्रपट नाकारला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.