Home /News /entertainment /

 ‘टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे चित्रपट मिळत नाही’; रिद्धीने केली बॉलिवूडची पोलखोल

 ‘टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे चित्रपट मिळत नाही’; रिद्धीने केली बॉलिवूडची पोलखोल

काम मागायला गेल्यास चित्रपट निर्माते, दिग्दर्शक टिव्ही कलाकारांना आम्ही काम देत नाही असं म्हणून अपमान करतात असा खळबळजनक आरोप तिनं केला आहे.

    मुंबई 5 जुलै: रिद्धी डोगरा (Ridhi Dogra) ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध मालिकांमधून तब्बल एक दशक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रिद्धी आजही कामाच्या शोधात आहे. उत्तम अभिनय क्षमता असतानाही बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्याची संधी तिला अद्याप मिळालेली नाही. काम मागायला गेल्यास चित्रपट निर्माते, दिग्दर्शक टिव्ही कलाकारांना आम्ही काम देत नाही असं म्हणून अपमान करतात असा खळबळजनक आरोप तिनं केला आहे. (bollywood is humiliating and insulting) जॅकी श्रॉफसमोर पत्नीनं केली गुंडांची धुलाई; अभिनेत्यानं सांगितला भन्नाट किस्सा हिंदी है हम या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रिद्धी आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडेच तिनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं आपल्या करिअरमधील हा थक्क करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “टीव्ही कलाकारांना बॉलिवूडमध्ये निम्न दर्जाचे कलाकार असं समजलं जातं. वारंवार आमचा टीव्ही कलाकार म्हणून अपमान केला जातो. मी अनेकदा बॉलिवूड चित्रपटांच्या ऑडिशनला गेले आहे. मात्र ऑडिशन पास करुनही काम मिळत नाही कारण आम्ही टीव्हीचे कलाकार आहोत. मालिकांमध्ये काम करणाऱ्यांनी तिथंच काम करावं या ठिकाणी प्रयत्न करु नये असं म्हणत आमचा अपमान केला जातो. आम्हाला देखील काम करण्याचा पुर्ण अधिकार आहे. चित्रपटांमध्ये नव्या अभिनेत्रींना संधी दिली जाते अन् आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय आमच्यात क्षमता आहे. आम्ही देखील ग्लॅमरस दिसतो तरी देखील आमच्यासोबत भेदभाव केला जातो. असा अनुभव घेऊन आता मी थकले आहे.” 'गंदी बात' फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका; नुकताच मिळाला होता जामीन रिद्धीनं 2007 साली झूमे जिया रे या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर हिंदी है हम, हॉरर नाईट्स, सेव्हेन, ये है आशिकी, दिया और बाती हम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली. हिंदी है हम या मालिकेतून ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. मालिकेंसोबतच तिनं झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे. मात्र इतका अनुभव असताना देखील तिला अद्याप बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळालेली नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या