Home /News /entertainment /

 ‘...तर मग मुलाचा धर्म हिंदू होणार का?’ आमिरच्या घटस्फोटावर कंगना रणौतचा सवाल

 ‘...तर मग मुलाचा धर्म हिंदू होणार का?’ आमिरच्या घटस्फोटावर कंगना रणौतचा सवाल

एखाद्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर महिलेलाच धर्म का बदलावा लागतो? असा सवाल तिने आपल्या चाहत्यांना केला आहे.

    मुंबई 5 जुलै: कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी ते देशभरातील राजकारणी अशा विविध विषयांवर ती रोखठोक प्रतिक्रिया देताना दिसते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. (Aamir Khan Kiran Rao divorce) यावेळी तिने आमिर खानच्या घटस्फोटाचं निमित्त साधून हिंदू-मुस्लीम विवाहावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर महिलेलाच धर्म का बदलावा लागतो? असा सवाल तिने आपल्या चाहत्यांना केला आहे. ‘टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे चित्रपट मिळत नाही’; रिद्धीने केली बॉलिवूडची पोलखोल “एक काळ असा होता जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. तशी परंपरा होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मुस्लीम, मुस्लीम आणि शीख समाजामध्ये नाही. आमिर खान सरांनी घटस्फोट घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुलं नेहमीच मुस्लीम का होतात. महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लीम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?” अशा आशयाची पोस्ट कंगना रणौतनं इन्स्टाग्रामवर केली आहे. ‘आता काही खर नाही...’; आर्चीचा Hot Look पाहून चाहते झाले सैराट आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट (Joint Statement issued by Aamir Khan and Kiran Rao) जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ' या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं  आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून'.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Aamir khan, Entertainment, Kangana ranaut

    पुढील बातम्या