मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतच्या वाढदिवशी बहिणीची अनोखी श्रद्धांजली, केली 25 लाख रुपयांच्या स्कॉलरशिपची घोषणा

सुशांतच्या वाढदिवशी बहिणीची अनोखी श्रद्धांजली, केली 25 लाख रुपयांच्या स्कॉलरशिपची घोषणा

कॅलिफोर्निया विद्यापीठात अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (Astrophysics) शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांच्या स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठात अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (Astrophysics) शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांच्या स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठात अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (Astrophysics) शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांच्या स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

  • Published by:  Karishma

मुंबई, 21 जानेवारी : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आता सात महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. पण अजूनही त्याचे कुटुंबिय या दुःखातून सावरलेले नाहीत. आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. सुशांतच्या बहिणीने (Shweta Singh Kirti) त्याच्या वाढदिवशी खास स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (Astrophysics) शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांच्या स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

श्वेताने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर यासंबंधी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुशांतचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हा पुढाकार घेतल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंहच्या इ्न्स्टाग्राम पोस्टचे फोटो टाकत कॅलिफोर्निया विद्यापीठातील अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विभागात 35 हजार डॉलरचा सुशांतसिंह राजपूत मेमोरियल फंड (The Sushant Singh Rajput Memorial Fund) उभारण्यात आला आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये (Astrophysics) करिअर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क साधावा. हे काम शक्य करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करते की तू जिथे असशील तिथे आनंदी असशील, असा मेसेज लिहिला आहे.

(वाचा - 'तू नेहमी आनंदी, रोमँटिक, हुशार असाच आठवणीत राहशील', सुशांतच्या वाढदिवशी अंकिताने शेअर केला हा VIDEO)

काही दिवसांपूर्वी श्वेता सिंहने सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आपल्या हाताने लिहिलेली एक नोट पोस्ट केली होती. यामध्ये त्याने, मी माझ्या आयुष्यातील सुरुवातीची 30 वर्ष काहीतरी बनण्यात घालवली. मला प्रत्येक गोष्टीत उत्तम व्हायचं होतं. मला टेनिसमध्ये चांगलं व्हायचं होतं, शाळेत चांगले मार्क देखील मिळवायचे होते. यासाठी मी त्याच दृष्टीने इतके वर्ष प्रयत्न करत होतो. मी जसा आहे तसा ठीक नाही, परंतु जर मला चांगल्या गोष्टी मिळाल्या तर..., अशा भावना सुशांतने या नोटमधे व्यक्त केल्या होत्या.

(वाचा - मुंबई उच्च न्यायालयाचा सोनू सूदला झटका! BMC विरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली)

दरम्यान, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाची ईडी चौकशी देखील झाली. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन असल्याचं देखील समोर आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा 'दिल बेचारा' हा शेवटचा चित्रपट 24 जुलै 2020 ला रिलीज करण्यात आला होता. एम्सच्या अधिकाऱ्यांनी सुशांतने आत्महत्या केली होती हे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होत असल्याचं जाहीर केलं होतं.

First published:

Tags: Sushant sing rajput