मुंबई, 21 जानेवारी: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आठवणी आज पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. सुशांत जर आज आपल्यात असता तर तो 35 वर्षांचा झाला असता. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी फोटो, त्याचे व्हिडीओ, त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 14 जून 2020 रोजी सुशांतने आत्महत्या केली. तो आपल्यात नाही यावर अनेकांचा आजही विश्वास बसत नाही आहे. पण हे सत्य स्विकारण्याचा प्रयत्न त्याचे जवळचे मित्रमंडळी, चाहते करत आहेत. त्याच्यासह असणारे आनंदी क्षण आठवून अनेकजण हे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील सुशांतच्या काही 'Happy Moments' शेअर केल्या आहेत. सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याने त्याचा कुत्रा स्कॉच (Scotch) बरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सुशांत स्कॉचबरोबर खेळताना दिसत आहे. अंकिताने हा व्हिडीओ शूट केला होता. अंकिता-सुशांत रिलेशनशीपमध्ये असतानाचा हा व्हिडीओ असावा असे लक्षात येते आहे.
(हे वाचा-आईसोबत चिमुकल्यानेही धरला ताल; प्रियंका बर्वेने शेअर केला VIDEO)
अंकिताने हा व्हिडीओ शेअर करताना #sushantday असा हॅशटॅग वापरला आहे. तिने यावेळी असं लिहिलं आहे की, ‘मला कळत नाही आहे की कशी सुरुवात करू आणि काय बोलू पण तुला साजरे करण्यासाठी सुशांत मी आज तुझे काही जुने व्हिडीओ शेअर करणार आहे. माझ्या तुझ्याबरोबरच्या याच आठवणी आहेत आणि तू किती आनंदी, हुशार, रोमँटिक, वेडा आणि प्रेमळ आहेस हेच कायम माझ्या आठवणीत राहिल. स्कॉचला नेहमी तुझी आठवण यायची आणि आता तर तो तुला खूप मिस करेल. मी प्रार्थना करते आणि मला माहित आहे की तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी असशील. Happy Birthday to you, तुझी नेहमी आठवण येईल.’
View this post on Instagram
सुशांत त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होतच होता, त्याचे फॅन फॉलोइंग वाढतच होते इतक्यात त्याच्या आत्महत्येने होत्याचं नव्हतं केलं. त्याच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांसाठी, कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी सर्वकाही बदललं होतं. पण आजही तो या सर्वांच्या आठवणीत आहे. आजही त्याचे असे आनंदी व्हिडीओ पाहून लोकं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आजही त्याच्या अभिनयाला दाद मिळते आहे. मात्र त्याने इतकं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं, असं राहून राहून सर्वांना वाटतं आहे. सुशांतबाबत वाटणाऱ्या या भावना त्याच्या चाहत्यांनी आज सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.