मुंबई, 06 फेब्रुवारी: सहा दशकांहून अधिक काळ भारतीयांवर आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांची आज पुण्यतिथी. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी आजच्या दिवशी अक्खा देश हळहळला होता. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज आणि स्वर मात्र अजरामर आहे. आपल्या आजावानं लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या दीदी केवळ भारतात नाही तर विदेशातही तितक्याच प्रसिद्ध होत्या. एक अद्भूत गायिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भाषेत ३० हजार पेक्षा अधिक गाणी गायली. आज त्यांचा शेवटचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लतादीदी त्यांच्या शेवटच्या काळात आजारी पडल्या होत्या. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये लतादीदी कोणाचा तरी आधार घेऊन चालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लता मंगेशकर यांचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खूप भावुक होत आहेत. हेही वाचा - Lata Mangeshkar: आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या ‘इतकी’ संपत्ती; आता कोण आहे वारसदार? हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं आहे की त्यांची प्रकृती इतकी वाईट आहे की ती आधाराशिवाय चालू शकत नाही. दोन महिलांनी लता मंगेशकर यांना पकडलं असून त्या हळू चालत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Lata Mangeshkar's last video #LataMangeshkar ❤️ pic.twitter.com/NfVUiseC0N
— Divyesh Trivedi (@DivyeshTrivedi_) February 6, 2022
लता मंगेशकर यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, मात्र ५ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सगळ्या देशवासीयांनी शोक व्यक्त केला होता.
अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. भावोत्कट स्वर, प्रसंगानुरूपच नव्हे तर पडद्यावर ज्या नायिकेसाठी आपला आवाज असणार आहे त्या भूमिकेनुसार लता मंगेशकरांनी पार्श्वगायनातले बारकावे टिपले. सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाज या जोरावर त्यांनी हे अढळ स्थान प्राप्त केलं. पण इथपर्यंत पोहोचण्याचा आणि ते स्थान शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रवास सहजसाध्य नव्हता.