मुंबई 10 जुलै: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज वाढदिवस आहे. (Sunil Gavaskar birthday) 72 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘लिटल मास्टर’ या टोपण नावानं ओळखले जाणाऱ्या गावसकरांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता. वादळी गोलंदाजांसमोर हेल्मेटशिवाय उभे राहण्याची ताकद गावसकरांकडे होती. (Lata Mangeshkar) अशा या महान क्रिकेटपटूला भारताच्या गाणकोकीळा लता मंगेशकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद
“सुनील गावसकर हे नाव संपूर्ण जगाला ठावूक आहे. मला त्यांची क्रिकेट खेळण्याची शैली प्रचंड आवडायची. सचिनप्रमाणेच त्यांना पाहून देखील असंच वाटायचं त्यांनी खेळतच राहावं. कधी निवृत्ती घेऊच नये.” अशा आशयाचं ट्विट करत लतादीदींनी गावसकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Namaskar. Sunil Gavaskar ye naam Cricket ki duniya mein kaun nahi jaanta..Mujhe unka cricket bahut accha lagta tha, main hamesha chahti thi ki wo khelte rahein retirement na lein,jaise Sachin ke baare mein bhi lagta tha.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 10, 2021
‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा
सुनील गावसकर यांनी मार्च 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 65 आणि दुसर्या डावा67 धावा केल्या. हा सामना सात विकेट्सने जिंकण्यात भारताला यश आले. गावसकरांनी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 774 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 4 शतके 3 अर्धशतके झळकावली. आजही जगातील कोणताही फलंदाज त्याच्या पदार्पण मालिकेत इतक्या धावा करू शकलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.