मुंबई, 17 जून: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ( Aamir Khan) लगान सिनेमाला नुकतीच 21 वर्ष पूर्ण झाली (21 Years Of Lagaan) आमिर खानने ‘लगान: वन्स अपॉन ए टाइम’ची २१ वर्षे साजरी करण्यासाठी त्याच्या घरी ‘मरिना’ ( Mareena) येथं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टनी हजेरी लावली होती. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेला ‘लगान’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी सिनेमांपैकी एक आहे. ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा हा लगान आहे. आमिर खाननं त्याच्या सोशल मीडियावरुन सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. व्हिडिओमध्ये चित्रपटातील ‘चले चलो’ हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसत आहे. सिनेमाची स्टारकास्ट या सेलिब्रेशनच्या निमित्तानं अनेक वर्षांनी एकत्र आली. पार्टीला आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. हेही वाचा - हृता नंतर अभिनेता अंजिक्य राऊतचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, ‘या’ सिनेमात दिसणार हटके अंदाजात आमिर खानच्या अभिनय कारकिर्दीतील लगान हा सिनेमा फार महत्त्वाचा ठरला. आजही लगान सिनेमातील आमिर अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे आमिरला ‘लगान’ला भावनिक महत्त्व आहे. 2021 मध्ये महामारीच्या काळात, सिनेमाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाली. पण निर्बंधांमुळे कलाकारांनी वर्चुअल सेलिब्रेशन केलं होतं. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन सिनेमाची 21 वर्ष मोठ्या जल्लोषात साजरी केली. 2001मध्ये प्रदर्शित झालेला लगान हा सिनेमात 1893 मधील भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या व्हिक्टोरियन काळातील कथा दाखवण्यात आली आहे. आशुतोष गोवारीकर यांनी सिनेमात दिग्दर्शन केलं होतं तर आमिर खान प्रॉडक्शननं सिनेमाची निर्मिती केली होती. लगानच्या 21 वर्ष पूर्तीनिमित्त सिनेमातील अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. सिनेमाची कथा त्यातील कलाकार महत्त्वाचे होतेच पण त्याहून जास्त म्हणजे सिनेमातील गाणी. आजही लगान मधील गाणी प्रेक्षकांच्या ओठांवरती आहेत. आजही पाऊस पडल्यावर काले मेघा हे गाणं आवर्जुन ऐकलं जातं. आमिर खानच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर आमिर खानचा लाल सिंह चड्डा हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







