Home /News /entertainment /

हृता नंतर अभिनेता अंजिक्य राऊतचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'या' सिनेमात दिसणार हटके अंदाजात

हृता नंतर अभिनेता अंजिक्य राऊतचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'या' सिनेमात दिसणार हटके अंदाजात

हृता नंतर अभिनेता अंजिक्य राऊतचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'या' सिनेमात दिसणार हटके अंदाजात

हृता नंतर अभिनेता अंजिक्य राऊतचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'या' सिनेमात दिसणार हटके अंदाजात

अभिनेत्री हृता दुर्गुळे ( Hruta Durgule) नंतर अभिनेता अजिंक्य राऊतही ( Ajinkya Raut) मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. मराठीत आघाडीच्या अभिनेत्याबरोबर अंजिक्य राऊत झळकणार आहे.

  मुंबई, 17 जून:  मन उडू उडू मालिकेतून ( Man Udu Udu Jhal) महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला साऊथ इंडियन टच असलेला चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता अंजिक्य राऊत ( Ajinkya Raut) विठू माऊली आणि मन उडू उडू झालं मालिकेतून छोटा पडदा गाजवल्यानंतर अंजिक्य राऊत आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 'टकाटक 2' ( Takatak 2) या सिनेमात अंजिक्य हटके अंदाजात दिसणार आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत अंजिक्यनं हे सप्राइज त्याच्या चाहत्यांना दिलं आहे. १९ ऑगस्ट २०२२ रोजी 'टकाटक २'  (Takatak 2 Release Date) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.   दीपू ( Deepu) म्हणजे अभिनेत्री हृतानंही अनन्या ( Ananya) आणि टाईमपास 3 ( Timepass 3) मधून सिनेमात पदार्पण केलं आहे. हृता नंतर आता अंजिक्यला देखील सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. धमाल आणि मज्जा-मस्तीने भरलेला टकाटक हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या धम्माल कॉमेडीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  टकाटकच्या जबरदस्त यशानंतर टकाटक 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळीही अभिनेता प्रथमेश परब ( Prathamesh Parab) प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्याचप्रमाणे सर्वांचा लाडका इंद्रा ( Indra) म्हणजे अभिनेता अजिंक्य राऊत सिनेमात असल्यानं प्रेक्षकांसाठी हे खास सप्राइज असणार आहे.
  हेही वाचा - Man Udu Udu Jhal: इंद्रा-दीपूची ताटातूट! अखेर देशपांडे सरांसमोर येणार इंद्राची खरी ओळख 'टकाटक'ला मिळालेल्या यशाच्या बळावर प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन करण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलेला सिक्वेल म्हणजेच 'टकाटक २' या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे.  पहिल्या भागाचं कथानक आणि त्या माध्यमातून दिलेला संदेश तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता 'टकाटक २'मध्ये काय पहायला मिळणार याची उत्सुकता आहे. 'टकाटक २'मध्ये प्रथमेश परब, अजिंक्या राऊत त्याच्यासोबत अक्षय केळकर, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या