मुंबई, 27 डिसेंबर : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबी याचं काल रात्री निधन झालं. कुशालनं त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली असून कुशलच्या निधनाच्या वृत्ताला त्याचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांनी पुष्टी दिली. काल रात्री उशीरा त्याच्या घरी कुशलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुशल अवघ्या 37 वर्षांचा होता. त्यांचा मित्र अभिनेता चेतन हंसराजनं कुशलच्या आत्महत्येबाबत धक्कादायक खुलासा केला. टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चेतननं सांगितलं, ‘हो त्यानं आत्महत्त्या केली. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद होत असतं तिच्यापासून वेगळं होण्याच्या दुःखामुळे तो मागच्या काही दिवसांपासून खूप निराश आणि आजारी सुद्धा होता. काही दिवसांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यानं या गोष्टींचा उल्लेख करत खूप डिस्टर्ब असल्याचंही सांगितलं होतं. मी त्याची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो असं काही करेल असा मी कधीच विचार केला नव्हता.’ अर्पिता खान झाली आई, सलमानला मिळालं ‘बेस्ट बर्थडे गिफ्ट’
कुशलनं नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपीयन गर्लफ्रेंड Audrey Dolhen हिच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना 3 कियान नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. कुशलचं त्याच्या मुलावर प्रचंड प्रेम होत. मात्र पती-पत्नीतील वादांमुळे त्याची पत्नी आणि मुलगा सध्या संघाई येथे राहत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कुशलनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. ही त्याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली. त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी त्यानं आत्महत्या केली. त्यामुळे त्याचं असं जाणं सर्वांच्या मनाला चटका लावणारं ठरलं. कुशल पंजाबीच्या आत्महत्येबद्दल मित्राचा धक्कादायक खुलासा
घराच्या झडती दरम्यान पोलिसांना कुशलच्या घरात एक सुसाईड नोट सापडली आहे. या दीड पानी नोटवरुन दिसून येत की तो नैराश्यग्रस्त परिस्थिती होता. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यानं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यानं त्याची सर्व संपत्ती 2 भागात वाटली आहे. त्याच्या एकूण संपत्तीपैकी 50 टक्के भाग हा त्याच्या आई-वडीलांच्या नावे करण्यात आला आहे तर उरलेला 50 टक्के भाग हा त्याचा 3 वर्षाचा मुलगा कियानच्या नावे करण्यात आला आहे. वादग्रस्त व्हिडीओनंतर रवीना टंडनचा माफीनामा, पोस्ट लिहून मांडली बाजू कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘जिंदगी विन्स’ या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं.