मुंबई, 27 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन फिल्म मेकर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्या विरोधात नुकतीच एफआयआर दाखल करण्यात आली होती. या तिघांनी एका शोमध्ये ख्रिस्ती सामुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या तिघींवरही करण्यात आला होता. या तिघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री रवीना टंडननं माफी मागत ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. रवीनानं माफी मागताना ट्विटरवर लिहिलं, कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा. मी एकही असा शब्द असा वापरलेला नाही ज्यामुळे कोणत्याही धर्माचा अपमान होईल. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमच्या तिघींचाही हेतू नव्हता. पण आमच्यामुळे जर कोणाला यामुळे त्रास झाला असेल किंवा भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सर्वांची मनापासून माफी मागते. या पोस्टसोबत तिनं या शोच्या एपिसोडची युट्यूब लिंक सुद्धा शेअर केली आहे. आई-वडिलांनंतर ‘खास’ आहे ही व्यक्ती, त्याच्यासाठी काय पण करू शकतो दबंग खान!
रवीना, फराह आणि भारती यांच्या विरोधात अमृतसरच्या अजनाला येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार एका शोमध्ये या तिघींनी एका सामुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. या तिघींनी एका कॉमेडी शोमध्ये ख्रिस्ती धर्माबद्दल काही असे शब्द बोलले आहेत जे लोकांना आवडलेले नाही. त्यांनी ज्या शब्दांचा वापर या शोमध्ये केला आहे हे ख्रिस्ती धर्माचा अपमान करणारे आहेत असंही या तक्रारीत म्हणण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारित करण्यात आला होता. यानंतर या तिघींच्याही प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ‘तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,’ ब्रेकअपनंतर सलमानने काढला राग काही दिवसांपूर्वी फराह खान बिग बॉस 13 होस्ट करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यानंतर त्यानं या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय अभिनेत्री रवीना टंडन CAA बाबत एक कार्टुनचा फोटो शेअर केल्यानं ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. अखेरच्या क्षणी सलमान खानच्या लग्नात आली अडचण आणि…