अर्पिता खान झाली आई, सलमानला मिळालं 'बेस्ट बर्थडे गिफ्ट'

अर्पिता खान झाली आई, सलमानला मिळालं 'बेस्ट बर्थडे गिफ्ट'

सलमान खानची बहीण अर्पिता खान दुसऱ्यांदा आई झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : सलमान खानची बहीण अर्पिता खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. आज दुपारी अर्पिता एका गोंडस मुलीला जन्म दिला. भाऊ सलमान खानला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी अर्पितानं डिलिव्हरीसाठी सी सेक्शनचा आधार घेत बाळाला जन्म दिला. त्यामुळे सलमानसाठी आजचा दिवस खूप खास आहे.

अर्पिता खान आणि आयुष शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांनी मुलीचं नाव आयत (Ayat) असं ठेवलं आहे. अर्पितानं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करुन याची माहिती दिली. तिनं लिहिलं, ‘आमच्या मुलीचं आम्ही या जगात स्वागत करत आहोत. कृतज्ञ आणि आनंदी..!!’

सलमान खान आज 54 वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस जवळचा मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत पनवेल फार्महाऊसवर साजरा करतो. यावर्षी बहीण अर्पितासाठी त्यानं फार्म हाऊसवरचा बर्थ डे पार्टी प्लान रद्द केला होता. तिच्या डिलिव्हरीच्या वेळी तिच्यासोबत राहण्याला त्यानं प्राधान्य दिलं.

सलमान खानचं त्याची बहीण अर्पितावर असलेलं प्रेम सर्वांनाच माहित आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं दुसऱ्यांदा प्रग्नंट असल्याची न्यूज दिली होती. डॉक्टरांनी तिला डिलिव्हरीसाठी 27 डिसेंबर ही तारीख दिली होती. त्यामुळे सलमाननं या दिवशी बहीण अर्पितासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अर्पिता आणि आयुष यांनी सलमान खानचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी 27 डिसेंबरला सी सेक्शन डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे आता आलेल्या या गोड परीच्या रुपात सलमानला वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट मिळालं असं म्हणायला हरकत नाही.

आयुष आणि अर्पितानं 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये मुलगा अहिलचा जन्म झाला. अहिल सलमानचा जीव की प्राण आहे. हे त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येत. पण आता या नन्ही परीच्या आगमनानं शर्मा आणि खान कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या