जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कुशल पंजाबीच्या आत्महत्येबद्दल मित्राचा धक्कादायक खुलासा

कुशल पंजाबीच्या आत्महत्येबद्दल मित्राचा धक्कादायक खुलासा

कुशल पंजाबीच्या आत्महत्येबद्दल मित्राचा धक्कादायक खुलासा

काल रात्री उशीरा त्याच्या घरी कुशलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या आत्महत्येबद्दल त्याच्या मित्रानं धक्कादायक खुलासा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबी याचं काल रात्री निधन झालं. कुशालनं त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली असून कुशलच्या निधनाच्या वृत्ताला त्याचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांनी पुष्टी दिली आहे. काल रात्री उशीरा त्याच्या घरी कुशलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुशल अवघ्या 37 वर्षांचा होता. सुरुवातीला त्याच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालं नव्हतं. मात्र आता त्यांचा मित्र अभिनेता चेतन हंसराजनं कुशलच्या आत्महत्येबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चेतननं सांगितलं, ‘हो त्यानं आत्महत्त्या केली. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद होत असतं तिच्यापासून वेगळं होण्याच्या दुःखामुळे तो मागच्या काही दिवसांपासून खूप निराश आणि आजारी सुद्धा होता. काही दिवसांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यानं या गोष्टींचा उल्लेख करत खूप डिस्टर्ब असल्याचंही सांगितलं होतं. मी त्याची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो असं काही करेल असा मी कधीच विचार केला नव्हता.’ अक्षय-सलमानच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याची आत्महत्या

जाहिरात

दरम्यान पोलिसांना कुशलच्या घरात एक सुसाईड नोट सापडली आहे. या दीड पानी नोटवरुन दिसून येत की तो नैराश्यग्रस्त परिस्थिती होता. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यानं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यानं त्याची सर्व संपत्ती 2 भागात वाटली आहे. त्याच्या एकूण संपत्तीपैकी 50 टक्के भाग हा त्याच्या आई-वडीलांच्या नावे करण्यात आला आहे तर उरलेला 50 टक्के भाग हा त्याचा 3 वर्षाचा मुलगा कियानच्या नावे करण्यात आला आहे. कुशलच्या निधनाची बातमी त्याचा मित्र अभिनेता करणवीर बोहरा यांनं त्याच्या इन्स्टग्राम अकाउटंवरुन दिली. कुशल-करणवीर खूप चांगले मित्र होते. करणवीरनं लिहिलं, ‘तुझ्या मृत्यूच्या बातमीनं मला फार मोठा धक्का बसला आहे. मला या गोष्टीवर अद्याप विश्वास बसत नाही आहे. तू आमच्यात नाहीस पण जिथे कुठे असशील तिथे खूश असशील अशी आशा करतो. ज्याप्रमाणे तू जगलास त्यानं मला नेहमीच प्रेरणा मिळाली. पण असं काही होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.’ आई-वडिलांनंतर ‘खास’ आहे ही व्यक्ती, त्याच्यासाठी काय पण करू शकतो दबंग खान!

जाहिरात

कुशलनंच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यानं Audrey Dolhen हिच्याशी 2015 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘जिंदगी विन्स’ या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं. ‘तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,’ ब्रेकअपनंतर सलमानने काढला राग

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात