जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत उतरण्यासाठी रणवीरने जिवाचं रान केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित 83 या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांना कमालीच्या अपेक्षा आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत उतरण्यासाठी रणवीरने जिवाचं रान केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या भूमिकेसाठी त्याने खास फिटनेस कन्सल्टन्ट राजीव मेहराकडून विशेष प्रशिक्षण घेतलं. कपिल यांच्या व्यक्तिरेखेसाठी रणवीरने काय विशेष तयारी केली याबद्दल राजीवने विशेष माहिती दिली. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत राजीव म्हणाला की, गोलंदाजीमुळे तुमच्या लोअर बॉडीवर जास्त ताण येतो. कारण गोलंदाजी करताना तुमचं वजन कधी फ्रन्ट फुट तर कधी बॅक फुटवर असतं. त्यामुळे रणवीरच्या ट्रेनिंगवेळी त्याला हालचाली करताना आत्मविश्वास वाटावा याकडे माझं विशेष लक्ष होतं. तसेच त्याला सतत वाटायचं की तो जोरात धावला तर त्याच्या गुडघ्यांना इजा होऊ शकते. पण मला त्याच्या मनातली ही भीतीही दूर करायची होती. अशा परिस्थितीत आम्ही सर्वातआधी त्याचे ग्लूट मसल सशक्त करण्याला प्राधान्य दिलं.

जाहिरात

असं होतं रुटीन- - सकाळी 20 मिनिटं फुटबॉल खेळून रणवीर वॉर्मअप करायचा. त्यानंतर स्ट्रेचिंग करायचा. - रणवीर जवळपास 12 ते 13 षटकांची गोलंदाजी करायचा. त्यानंतर फलंदाजीही करायचा. यादरम्यान तो जवळपास 200 चेंडू खेळायचा. - ब्रेक घेऊन तो फलंदाजी आणि गोलंदाजीचे स्वतःचे व्हिडीओ पाहायचा आणि त्यातून नोट काढायचा. - दररोज कमीत कमी चार तास तरी तो व्यायाम करायचा. - 40 मिनिटं स्विमिंगला द्यायचा यामुळे त्याच्या अतिरिक्त कॅलरीज कमी व्हायच्या.

रणवीर अगदी कपिल देव यांच्यासारखा दिसतो- दिग्दर्शक कबीर खान म्हणाला की, ‘रणवीर त्याची प्रत्येक व्यक्तिरेखा जगत असतो. सेटवर मी त्याची मेहनत पाहिली आहे. अनेकदा कट म्हटल्यानंतर तो भावुक व्हायचा. या व्यक्तिरेखेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. आता तुम्हाला कपिल देव आणि रणवीरमधला फरक सिनेमात दिसणार नाही.

जाहिरात

बॉडी स्ट्रेन्थवर घेतली मेहनत- - त्याच्या ट्रेनिंगमध्ये फक्त वजन कमी करण्याला प्राधान्य दिलं नव्हतं तर संपूर्ण एक्सरसाइजला अशा प्रकारे डिझाइन केलं होतं की, त्याच्या खांद्याला आणि बायसेप्सच्या बॉलिंग मसल्सला योग्य तो व्यायाम मिळेल. - राजीवने त्याच्याकडून असे काही व्यायाम प्रकार करून घेतले की ज्यात फोर्स लोवर बॉडीमधून अपर बॉडीवर जातो. वेट बॉल ट्रेनिंगही यालाच एक प्रकार आहे. - ट्रेनिंगच्या सुरुवातीला रणवीचं वजन 83 किलो होतं. सिनेमासाठी त्याला 10 किलो वजन कमी करायचं होतं. कारण 83 वर्ल्ड कपच्यावेळी कपिल यांचं वजन 75 किलो होतं. - रणवीरला जलद गोलंदाजीही करायची होती. राजीवच्या मते रणवीरचे गुडघे थोडे कमकुवत होते. त्यामुळे गुडघ्याच्या आजूबाजूच्या मसल्सची ताकदही वाढवायची होती. - त्याला पॉवर मूवमेन्ट ट्रेनिंगही देण्यात आली होती. यात उडी मारून एका पायावर कसं उभं राहायचं असतं ते शिकवण्यात आलं. स्ट्रेन्थवर आणि पावर वाढवण्यासाठी ऑलिम्पिक लिफ्टिंगही करून घेतली. - कपिल यांच्या रनअप पॉश्चर आत्मसात करण्यासाठी रणवीरकडून खास रनिंग एक्सरसाइजही करून घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात