जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांत सिंहचं 'ते' सिक्रेट फक्त क्रितीला होतं माहित, मृत्यूच्या तीन वर्षानंतर केला खुलासा

सुशांत सिंहचं 'ते' सिक्रेट फक्त क्रितीला होतं माहित, मृत्यूच्या तीन वर्षानंतर केला खुलासा

सुशांत सिंहचं 'ते' सिक्रेट फक्त क्रितीला होतं माहित

सुशांत सिंहचं 'ते' सिक्रेट फक्त क्रितीला होतं माहित

क्रिती सेननने तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ ठेवले असून त्याचा लोगोही ब्लू बटरफ्लाय असाच आहे. अभिनेत्रीने तिच्या प्रॉडक्शन हाऊसबाबत पोस्ट केलेली पाहून अनेकांनी याचा थेट संबंध सुशांत सिंह राजपूतशी जोडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 जुलै- टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी क्रिती सेनन फार कमी वेळात इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. ती अनेक बिग बजेट चित्रपटांचा भाग आहे. मागच्या काही दिवसांपासून क्रिती तिच्या आदिपुरूष सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आली होती. या सिनेमाला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. मात्र या सिनेमातील क्रितीच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक झालं. आता क्रितीने तिच्या करिअरमध्ये आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. आता क्रिती तिच्या नवीन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे क्रितीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आणि लोगो थेट तिचा जवळचा मित्र आणि सहकलाकार दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित आहे. वाचा- एकीकडे आत्या होण्याचं सुख, दुसरीकडे मोडला राम चरणचा बहिणीची संसार क्रिती सेननने तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ ठेवले असून त्याचा लोगोही ब्लू बटरफ्लाय असाच आहे. क्रितीच्या इन्स्टा बायोमध्ये निळ्या रंगाचे बटरफ्लाय इमोजी देखील दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या प्रॉडक्शन हाऊसबाबत पोस्ट केलेली पाहून अनेकांनी याचा थेट संबंध सुशांत सिंह राजपूतशी असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. सुशांतची फक्त ही जुनी पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यावरून लोकांनी फुलपाखरू कनेक्शन शोधले आहे. सुशांता आणि क्रिती चांगले मित्र होते.

News18

क्रितीच्या या घोषणेनंतर सुशांतचं एक जुनं संभाषण व्हायरल होत आहे. Reddit वर फॅन आणि सुशांतमध्ये हा संवाद झाला होता. ज्यामध्ये चाहत्याच्या लक्षात आले की, सुशांतने त्याच्या पोस्टमध्ये ब्लू बटरफ्लाय इमोजीचा खूप वापर केला आहे. या पोस्टमध्ये चाहत्याने सुशांतला विचारले आहे की, ‘मी पाहिले आहे की तू ब्लू बटरफ्लाय इमोजी खूप वापरतो, त्याचा काही विशेष अर्थ आहे की तुला फुलपाखरे आवडतात का?’. यावर सुशांतने या इमोजीचा अर्थ काय आहे हे सांगितले होते.

जाहिरात

सुशांतनं सांगितले होते सिक्रेट सुशांतने यामागचं सिक्रेट सांगत लिहिले होते की, हे सुरुवातीचे प्रतीक आहे, कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाणे, ते तुमचे आणि माझे आणि आपल्या सर्वांचे प्रतीक आहे. ज्यांच्यावर विश्वास आहे अशा भावना व्यक्त करणे, जीवनातील उलथापालथीचा अर्थ समजावून सांगणे. हा तुझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी आहे. तच्या या निळ्या फुलपाखराचे रहस्य काय आहे हे फक्त क्रितिला माहित होते आणि तिने त्याचा सुंदर वापर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात