Home /News /entertainment /

Kon Honaar Crorepati: महिला स्पर्धकाने केला असा काही पदार्थ की नवऱ्याला सुरु झाल्या उचक्या, काय आहे भानगड?

Kon Honaar Crorepati: महिला स्पर्धकाने केला असा काही पदार्थ की नवऱ्याला सुरु झाल्या उचक्या, काय आहे भानगड?

‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati) च्या मंचावर पूनम मोरे या स्पर्धक आल्या आहेत. त्यांच्या पतीने त्यांच्याबद्दल काय सांगितलं पाहा.

  मुंबई 6 जुलै: ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) हा सोनी मराठीवरील कार्यक्रम बराच लोकप्रिय झाला आहे. यातील वेगवेगळे सेगमेंट आणि भेट देणारे पाहुणे कलाकार या कार्यक्रमाची क्रेझ आणखी वाढवायला मदत करतात. या कार्यक्रमाच्या नव्या भागात एक स्पर्धक हॉट सीटचा आनंद घेताना दिसत आहेत. या महिला स्पर्धकाच्या पतीने एक अफलातून किस्सा शेअर केला ज्यात त्यांना एक पदार्थ खाल्ल्यानंतर सतत उचक्या लागत होत्या. कोण होणार करोडपतीच्या (Kon Honaar Crorepati new episode) मंचावर एकाहून एक भन्नाट स्पर्धक येत असतात. कधी भावुक करणारी कहाणी तर कधी प्रेरणादायी कामगिरी करणारे अनेकजण या कार्यक्रमाचा भाग राहिले आहेत. पूनम मोरे सध्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. पूनम यांच्या पतीने कोण होणार करोडपतीच्या मंचावर एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. सचिन खेडेकर पूण यांच्या पतीला पत्नीच्या कुकिंग स्किलबद्दल विचारणा करतात तेव्हा त्यांचे पती सांगतात, “पूनम उत्तम जेवण बनवते. पण लॉकडाऊनमध्ये जशी वेगवेगळे पदार्थ बनवायची लाट आली होती तेव्हा पूनमने केक बनवला होता. चवीला उत्तम झाला होता, मला फार आवडला सुद्धा पण तो केक खाल्ल्यानंतर मला सारख्या उचक्या लागत होत्या. झोपेची वेळ सोडली तर सकाळी डोळे उघडल्यापासून सतत उचक्या लागत होत्या. आणि तब्ब्ल दोन दिवसांनी उचक्या बंद झाल्या. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की पुन्हा लॉकडाऊन करू नका” हे ही वाचा- Ajinkya Raut: इंद्रा-दीपूची लगीनघाई; पण हृताच्या नवऱ्याची अजिंक्यने घेतली परवानगी, काय आहे प्रकरण? महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये बरेच ट्रेंड पाहायला मिळाले. कधी जेवण्याच्या पद्धतीत तर लाईफस्टाईलमध्ये लोक बरीच विविधता आणायचा प्रयत्न करत होते. त्या नाविन्यात कधीतरी अशी फजिती सुद्धा होऊ शकते असा अनुभव पूनम यांच्या पटीने सांगितलेल्या किस्स्यातून जाणवतो.
  कोण होणार करोडपतीच्या मंचावर सध्या वेगवेगळ्या आणि थोर मंडळींची मांदियाळी दिसून आली. या कार्यक्रमात अशोक मामांपासून सुधा मूर्ती यांच्यापर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात ज्ञान आणि मनोरंजन यांचा सुरेख मेळ घातल्याचं पाहायला मिळतं. हिंदीतील प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचं हे मराठी व्हर्जन हिंदीइतकंच लोकप्रिय होताना दिसत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: KBC, Marathi entertainment, Sony tv

  पुढील बातम्या