मुंबई 6 जुलै: ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zala) मालिकेत सध्या इंद्रा आपलं जुनं रूप बदलून सभ्य आणि सज्जन होण्याच्या मार्गावर आपला प्रवास सुरु करताना दिसत आहे. गुंड प्रवृत्ती सोडून स्वतःमध्ये बदल आणून एक चांगला माणूस होण्यासाठी इंद्रा प्रयत्न करताना दिसत आहे. यातच एक अजून सुखवणारी बातमी दीपू आणि इंद्राच्या फॅन्ससाठी येत आहे. ती म्हणजे इंद्रा आणि दीपूच्या लग्नाची. मालिकेत लवकरच इंद्रा आणि दीपूचा लग्नसोहळा दाखवला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे. मालिकेत इंद्राचं पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतने (Ajinkya Raut) नुकतंच एका मुलाखतीत याबद्दल स्पष्टता दिली. त्यामुळे अखेर दीपू आणि तिच्या इंद्राचा विरह संपणार आणि त्यांच्या घरी सनई वाजणार असे संकेत मिळाले आहेत. अजिंक्य या मुलाखती त सांगतो, ‘रियल लाईफमधलं हृताचं लग्न अनेकांनी एन्जॉय केलं. आता मालिकेत सुद्धा माझं आणि हृताचं लग्न होताना दिसणार आहे. येत्या महिन्याभरातच आमची हळद, लग्न अशा सगळ्या गोष्टीबद्दल जोरदार प्लॅनिंग सुरु आहे आणि लवकरच काही सीन्समधून मालिकेत ट्रॅकची सुरवात होईलच. मी सुद्धा खूप उत्सुक आहे की कशा पद्धतीने लग्नाचा सिक्वेन्स लिहिला असेल आणि कशा पद्धतीने तो प्रेक्षकांना पाहायला मिळेल’. हे ही वाचा- Aditi Sarangdhar: लेकाचा मोबाईवरचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी अभिनेत्रीनं लढवली भन्नाट शक्कल अजिंक्य पुढे म्हणाला, ‘अखेर इंद्रा आणि दीपू एकत्र येणार आहेत. आमच्या नावाचे अनेक हॅशटॅग सुद्धा तयार केला आहे. माझं ऑन स्क्रीन पहिलंच लग्न आहे. त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अर्थात हृताशी स्क्रीनवर लग्न करण्याआधी मी प्रतीकची परवानगी घ्यायला हवी’. हृताच्या नवऱ्याची परवानगी घ्यायला हवी याबद्दल अजिंक्य हसतहसत उत्तर देताना दिसतो. अजिंक्य हृता आणि प्रतीक (Hruta Dugule wedding) यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता. अजिंक्य हृताचा जवळचा मित्र असल्याने त्याच्या अनुपस्थितीमुळे त्याला प्रेमळ बोलणी ऐकायला लागली होती. सध्या अजिंक्य आणि हृताचा ऑन स्क्रीन लग्नाचा ट्रॅक लवकरच सुरु होत असल्याचे संकेत अजिंक्यने स्वतः दिले असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हृता दुर्गुळे खऱ्या आयुष्यात तर लग्नाचा पुरेपूर आनंद घेताना दिसली आता ऑन स्क्रीन लग्नाला नेमकी कशी तयारी असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.