मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: कतरिना कैफमध्ये आहे 'ही' वाईट सवय; शाहिद कपूरच्या भावाचा खुलासा

Koffee With Karan 7: कतरिना कैफमध्ये आहे 'ही' वाईट सवय; शाहिद कपूरच्या भावाचा खुलासा

 बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीजन 7' या चॅट शोची प्रचंड चर्चा आहे. बॉलिवूडचे मोठ-मोठे सेलिब्रिटी या सीजनच्या प्रत्येक एपिसोडमध्ये मजेदार खुलासे करुन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 सप्टेंबर-   बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीजन 7' या चॅट शोची प्रचंड चर्चा आहे. बॉलिवूडचे मोठ-मोठे सेलिब्रिटी या सीजनच्या प्रत्येक एपिसोडमध्ये मजेदार खुलासे करुन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये होस्ट करण जोहर अभिनेत्री कतरिना कैफ, इशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदीसोबत मजामस्ती करताना दिसून येत आहे. यासोबतच शोमध्ये कलाकारांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित न ऐकलेल्या रंजक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. दरम्यान ईशान खट्टरने शोमध्ये आपल्या कतरिनाची एक सवय अजिबात आवडत नसल्याचा खुलासा केला आहे.

कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी लवकरच 'फोन भूत' या चित्रपटातून भेटीला येणार आहेत. तत्पूर्वी 'कॉफी विथ करण' च्या या सीजनमध्ये, 'फोन भूत' चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या संबंधित बऱ्याच गोष्टी उघड करुन शोला आणखी रंजक बनवलं आहे. ईशान खट्टरने शोमध्ये आपल्या खाजगी आयुष्याबाबतही खुलासे केले आहेत. शिवाय कतरिना कैफसोबत शूटिंग करताना तिच्या एका सवयीमुळे तो त्रासला होता याचासुद्धा खुलासा केला आहे.

'कॉफी विथ करण'मध्ये कतरिना कैफने तिच्या सहकलाकारांना विचारलं की तिच्या कोणत्या सवयीमुळे त्यांना खूप त्रास होतो. यावर उत्तर देत ईशान खट्टर म्हणाला की, 'माफ करा मी हे सांगणार आहे.तिच्या सगळ्या सवयी चांगल्या आहेत. जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलत असता तेव्हा ती लक्षपूर्वक ऐकते. परंतु हे फक्त तोपर्यंतच आहे जोपर्यंत ती खरोखर ऐकत आहे. एक वेळ अशी येते की ती तुमच्या डोळ्यात बघत असते पण तिचं लक्ष तुमच्याकडे नसतं. आणि तुम्हाला अचानक असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी नाही तर कोणत्यातरी भिंतीशी बोलत आहात'. ही गोष्ट आवडत नसल्याचं ईशानने म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

(हे वाचा:Koffee With Karan 7: अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला... )

लवकरच कतरिना कैफ ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'फोन भूत' या चित्रपटातून भेटीला येणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. येत्या 4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चाहत्यांना या त्रिकुटाला एकत्र पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif